Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे अपूर्वा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतली तिची 'शेवंता' ही भूमिका चांगलीच गाजली. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) चौथं पर्वदेखील तिने चांगलच गाजवलं आहे. 


अपूर्वा नेमळेकर आज सिंगल आयुष्य जगत असली तरी तिचं लग्न झालं होतं. पण काही कारणाने त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आज जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल...


लग्न ते घटस्फोट! अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्या...


अपूर्वा नेमळेकर 2014 साली लग्नबंधनात अडकली होती. रोहन देशपांडे (Rahan Deshpande) असं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव आहे. अपूर्वा आणि रोहन एकमेकांचे चांगले मित्र होते. आठ वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पारंपारिक पद्धतीत मुंबईत त्यांनी लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. 


अपूर्वा नेमळेकरचा पूर्वाश्रमीचा पती कोण आहे? (Who Is Rohan Deshpande)


अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव रोहन देशपांडे आहे. दादरमध्ये राहणारा रोहन हा राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे.  तो शिवसेनेचा पदाधिकारी असून सोशल मीडियावरदेखील चांगलाच अॅक्टिव्ह आहे. अनेक सामाजिक कार्यात तो सहभागी होत असतो. 


रिलेशन स्टेटसबद्दल अपूर्वा म्हणाली...


अपूर्वाचं तिच्या अभिनयासाठी नेहमीच कौतुक होत असतं. पण वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला ती टाळते. गेल्या काही दिवसांपूर्वी वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत तिच्या एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता की,"तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालं आहे?" यावर थेट उत्तर देत अपूर्वा म्हणाली होती,"सध्या तरी मी सिंगल असून 'त्या' खास व्यक्तीची वाट पाहत आहे". त्यामुळे अपूर्वा आता लवकरच दुसरं लग्न करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.






संबंधित बातम्या


Apurva Nemlekar : 'Bigg Boss' संपल्यानंतर अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांनी दिली गुड न्यूज; अण्णांची शेवंता आता झळकणार 'या' प्रोजेक्टमध्ये