Aamir Khan on Ex-Wives and Girlfriend: 'आम्ही पती-पत्नी होऊच शकत नाही...'; गर्लफ्रेंड गौरी आणि एक्स वाईफ्सबाबत काय म्हणाला आमिर खान?

Aamir Khan on Ex-Wives and Girlfriend Actor revealed he met girlfriend gauri Spratt mistakenly shares bond with ex wives See photos

Continues below advertisement

Aamir Khan on Ex-Wives and Girlfriend

Continues below advertisement
1/8
आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखलं जातं. हा अभिनेता गेल्या अनेक दशकांपासून चित्रपट उद्योगात काम करत आहे. अलीकडेच, आमिर खाननं अलीकडील पॉडकास्टमध्ये त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
2/8
आमिर खान राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून सामील झालेला. या दरम्यान आमिर खाननं त्याच्या लव्ह लाईफबाबत उघडपणे भाष्य केलं.
3/8
आमिर खाननं त्याची प्रेयसी गौरी स्प्राटबद्दलही भाष्य केलं. तो म्हणाला की, "गौरी आणि मी चुकून भेटलो आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो आणि प्रेमात पडलो. मला वाटलं की, माझी आई, मुलं, भावंडे आहेत. माझं इतकं जवळचं नातं आहे की, मला जोडीदाराची गरज नाही."
4/8
अभिनेता पुढे बोलताना म्हणाला की, "गौरीला भेटण्यापूर्वी मला असं वाटायचं की, माझं आता वय झालंय, मी म्हातारा झालोय. या वयात आता मला कोण भेटणार? त्यातच माझी थेरपी सुरू झाली आणि माझ्या लक्षात आलं की, सर्वात आधी मला स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. स्वतःचं आरोग्य जपायला हवं, त्यामुळे मी त्यावर काम करायला सुरुवात केली.
5/8
आमिरनं त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नींबाबत बोलताना सांगितलं की, "किरण आणि रीना यांच्याशी माझं खूप मजबूत, घट्ट नातं होतं आणि आम्ही अजूनही मित्र म्हणून एकमेकांच्या जवळ आहोत आणि आम्ही अजूनही एकमेकांचा आदर करतो. मी कधीही विचार केला नव्हता की, मी अशा एखाद्या व्यक्तीला भेटेन ज्याच्याशी मी अशा प्रकारे जोडला जाऊ शकेन."
Continues below advertisement
6/8
आमिर पुढे म्हणाला की, "किरण, रीना आणि मी अजूनही पाणी फाउंडेशनसाठी एकत्र काम करतो आणि आम्ही दररोज बसून बोलतो आणि एक कुटुंब म्हणून आमच्यात खरं प्रेम आहे आणि आम्ही नेहमीच एक कुटुंब राहू. आम्ही पती-पत्नी नसलो तरी, आम्ही नेहमीच एक कुटुंब राहू. त्या नेहमीच माझ्या कुटुंबाचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग राहतील."
7/8
आमिर किरण रावबाबत बोलताना म्हणाला की, "वेगळं झाल्यानंतर किरण आणि मी अजूनही मित्र म्हणून एकमेकांच्या खूप जवळ आहोत. मला आठवतंय की, आमचा घटस्फोट झालेला आणि त्यानंतर आम्ही लाल सिंह चड्ढाच्या शुटिंगसाठी लदाखला गेलेलो आणि तिथे आम्हाला एका गावाच्या उत्सवात आमंत्रित केलेलं आणि आम्ही दोघांनी तिथे एकत्र डान्स केलेला."
8/8
आमिरा खान म्हणाला की, "तिथून आम्ही डान्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला आणि अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, आताच घटस्फोट झाला आणि तरीही दोघे एकमेकांसोबत डान्स करत आहेत. आता मी प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही की, आमच्यात मैत्रीचं घट्ट नातं आहे. किरणनं लाल सिंह चड्ढाच्या शुटिंगच्या वेळी माझी खूप मदत केली आणि मी लापता लेडीजच्या वेळी तिची मदत केली.
Sponsored Links by Taboola