Ashi Hi Banwa Banwi : 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हा विनोदी सिनेमा 23 सप्टेंबर 1988 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. खळखळून हसवणारा हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. या सिनेमातील संवाद, लिंबू कलरची साडी अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या बहुचर्चित गाजलेल्या सिनेमासंबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या...


'अशी ही बनवाबनवी'बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? 


1. 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातला 'हा माझा बायको पार्वती' हा आयकॉनिक डायलॉग सिनेमाच्या संहितेत नव्हता. पण शूटिंगदरम्यान अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची चुकून हा डायलॉग म्हटला आणि तोच सर्वात जास्त हिट झाला. 


2. 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अश्विनी भावे (Ashwini Bhave) 16 वर्षांच्या होत्या. व्याच्या 16 व्या वर्षी आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं. 


3. 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीबी और मकान' या सिनेमाचा मराठी रिमेक आहे. 


4. 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमातली अनेक पात्र खूप गाजली. या सिनेमात शंतनूची भूमिका करणाऱ्या सिद्धार्थ राय यांनी रंजना यांच्या एका सिनेमात बालकलाकार म्हणून काम करत मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. 


5.  सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि अशोक सराफ यांनी 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाआधी एकत्र काम केलं होतं. पण सचिन आणि लक्ष्मीकांत पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करताना दिसून आले. 


6. आज बाल गंधर्वांची जयंती असून 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा त्यांना समर्पित करण्यात आला होता. 


7. 'कुणीतरी येणार गं' हा सीन शूट करताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिवसभर गरोदर बाईच्या गेटअपमध्ये राहावं लागलं होतं. 


8. 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सचिन यांनी स्त्रीचं रुप घेऊन सेटवर अनेकांसोबत प्रॅन्क केला होता. 


9. 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमासाठी लक्ष्मीकांत यांना विचारणा झाली तेव्हा ते खूप आनंदी झाले होते. त्यांनी लगेचच होकार दिला पण या सिनेमात स्त्री भूमिका करावी लागेल हे त्यांना कळल्यानंतर ते नाराज झाले होते. 
 
10. 'अशी ही बनवाबनवी'च्या शूटिंगदरम्यान सचिन लक्ष्मीकांत बेर्डे यांना म्हणाले होते की,"लोक माझ्याकडे स्त्री म्हणून बघतील पण तू करत असलेलं पार्वतीचं पात्र लोकांना जास्त आवडेल". 


संबंधित बातम्या


Ashok Saraf : 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाला लोक इतकं डोक्यावर घेतील असं वाटलं नव्हतं : अशोक सराफ