Apurva Nemlekar : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) अपूर्वाने चांगलचं गाजवलं आणि ती या पर्वाची उपविजेती ठरली. आता बिग बॉस संपल्यावर लगेचच अपूर्वाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अपूर्वा लवकरच एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अपूर्वाच्या आगामी शॉर्ट फिल्मचं नाव 'द डिलिव्हरी बॉय' (The Delivery Boy) असं आहे. 'बिग बॉस'मध्ये जाण्याआधीच तिने या शॉर्ट फिल्मचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून एका नवीन भूमिकेत अपूर्वाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अपूर्वा नेमळेकर कोण आहे? (Apurva Nemlekar)
टिकट टू फिनालेचा टास्क जिंकत अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची फायनलिस्ट ठरली. अपूर्वा पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली.
'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss) अपूर्वाच्या (Apurva Nemlekar) खेळाडूवृत्तीने, तिच्या स्पष्टवाक्तेपणामुळे सर्वांचं लक्ष वेधलं. 'बिग बॉस'मुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. अपूर्वाच्या अभिनयासाठी तिचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. मालिकांसह तिने रंगभूमीदेखील गाजवली आहे. 'आला मोठा शहाणा' या नाटकाच्या (Drama) माध्यमातून तिने रंगभूमीवर पदार्पण केलं. आता तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या