एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; आजचा भाग होणार संगीतमय!

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे हजेरी लावणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग विशेष असणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भीमराव पांचाळे  (Bhimrao Panchale) आणि प्रियंका बर्वे (Priyanka Barve) हजेरी लावणार आहेत. 

'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) विशेष भागात या आठवड्यात भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये ते ग़ज़ल सागर प्रतिष्ठान या संस्थेसाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. 

ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या सुरेल आवाजात ग़ज़ल सादर करून या विशेष भागाची सुरुवात केली. या विशेष भागात भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे यांनी  त्यांच्या कारकिर्दीतील धमाल  किस्से सांगितले. प्रियांका बर्वे यांनी चक्क गुलजार यांच्याकडून मिळालेली दाद आणि तो संपूर्ण किस्सा सांगितला आणि ती ग़ज़लही सादर केली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

करोडपतीचा हा खेळ भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे खेळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याबरोबर भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे यांच्या सुंदर गप्पा रंगणार आहेत. प्रियांका बर्वे यांनी मुगल-ए-आज़म करतानाचे काही किस्से सांगितले. मुगल-ए-आज़ममधील 'प्यार किया तो डरना क्या' हे सुरेल गीत सादर केले. त्याबरोबरच सचिन खेडेकरांनीही  ते मुगल-ए-आज़म बघायला जायचे तेव्हाचा किस्सा सांगितला. 

'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग कधी रंगणार? (Kon Honar Crorepati Special Episode)

भीमराव पांचाळे आणि गायिका प्रियंका बर्वे यांचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग 29 जुलै रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते ग़ज़ल सागर प्रतिष्ठान या संस्थेला देणार आहेत. ग़ज़ल सागर प्रतिष्ठानसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. या संगीतमय विशेष भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित; रंगणार विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget