एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? Msc. Bed शिक्षिकेनं चक्क लाईफलाईन घेतली

Kon Honar Crorepati : शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर शिक्षिकेला देता आलं नसल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Hanar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होत असतात. आता नुकत्याच पार पडलेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या एका सोप्या प्रश्नाचे उत्तर शिक्षिका देऊ शकलेली नाही.

'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व सध्या चर्चेत आहे. या पर्वातील नुकत्याच पार पडलेल्या एका भागात एक महिला शिक्षिका सहभागी झाली होती. दरम्यान त्या शिक्षिकेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला? असा प्रश्न विचारण्यात आला आणि प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड, रायगड हे चार पर्याय देण्यात आले. पण संबंधित शिक्षिकेला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि तिने व्हिडीओ फ्रेंड या लाइफ लाइनचा वापर केला.

शिक्षिका असूनही शिवाजी महाराजांसंबंधित सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नसल्याने महिलेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. शिक्षिकेचं MSC B.ed पर्यंतचं शिक्षण झालं असूनही तिला या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षिकेच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

शिक्षिकेच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? तयारी नसताना स्पर्धेत का गेलात? या शिक्षिकेला पुन्हा चौथीत बसवा, या परस्थितीला नवे शिक्षण धोरण जबाबदार, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? MSC B.ed शिक्षिकेला आलं नाही उत्तर किती दुर्दैव, एका शिक्षिकेला या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर 'रायगड' आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं. महाराजांचा राज्यभिषेक, समाधी, जगदिश्वराचे मंदिर, राजदरबार अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टी या किल्ल्यावर असल्यानं हा किल्ला महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान बनला आहे.

संंबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर रंगणार गप्पांची मैफील! आज रंगणार विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget