Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे गाजवणार Rodies! सेटवरील फोटो समोर
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे रोडीजमध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे.
Shiv Thakare Will Enter In Roadies : छोटा पडदा गाजवणारा शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. शिव नुकताच 'बिग बॉस 16'मध्ये दिसला होता. त्याची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता तो 'खतरों के खिलाडी 13'मध्ये (Khatron Ke Khiladi 13) स्टंटबाजी करताना दिसत आहे. आता 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे 'रोडीज'मध्ये (Roadies)दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठमोळ्या शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता 'खतरों के खिलाडी 13'नंतर तो 'रोडीज 19'मध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे. शिवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो एका खुर्चीत बसलेला दिसत आहे. ही खूर्ची रोडीजच्या गँग लीडरची आहे.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे 'रोडीज'मध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे 'रोडीज'चं शूटिंग पूर्ण केल्यानंतर शिव 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला अर्जेंटीनाला गेला होता. आता शिवला गँग लीडरच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'रोडीज 19'मध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), प्रिंस नरूला और गौतम गुलाटी ही मंडळी गँग लीडरच्या भूमिकेत दिसत आहेत. सोनू सूद हा कार्यक्रम होस्ट करत आहे. आता या गँग लीडरच्या टीममध्ये शिव ठाकरेची एन्ट्री होणार आहे. शिवच्या एन्ट्रीचा मालिकेच्या टीआरपीवर चांगलाच परिणाम होणार आहे.
शिव ठाकरे आणि अर्चना गौतम करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
शिव ठाकरे आणि अर्चना गौतम बिग बॉसच्या 16 व्या सिझनमध्ये एकत्र दिसले होते. आता ते दोघे ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये देखील एकत्र दिसणार आहेत. शिव आणि अर्चना यांच्यात बिग बॉस या शोमध्ये अनेकदा वाद व्हायचे. आता ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये देखील या दोघांमध्ये वाद होतील का? याचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये अर्चना आणि शिव यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या