KBC 16 : बिग बींनी विचारला 'मोनालिसा' संबंधित 20 हजार रुपयांचा प्रश्न, लाईफलाइन घेऊनही स्पर्धकाची निराशा; योग्य उत्तर काय?
Kaun Banega Crorepati 16 : कौन बनेगा करोडपती शोमध्ये 'मोनालिसा' संबंधित एका प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला देता आलं नाही. त्याला 20 हजार रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.
KBC 16 Contestant : सध्या बिग बी अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोच्या 16 व्या सीझनची कमान सांभाळत आहे. या शोमध्ये स्पर्धक धनराशी जिंकण्याची मोठी स्वप्न घेऊन येतात. या शोमध्ये अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकासोबत जोडले जातात आणि त्यांचे अनुभव सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. या शोमध्ये स्पर्धकांच्या आयुष्यातीलच गोष्टी नाही, तर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबासंबंधित अनेक गोष्टीही समोर येतात. कौन बनेगा करोडपती शोमध्ये जनरल नॉलेज संदर्भात प्रश्न विचारले जातात. काही स्पर्धक उत्तर देण्यात सफल होतात, तर काही स्पर्धकांना उत्तर माहित नसल्याने किंवा उत्तर चुकल्याने थोडक्यात समाधान मानावं लागतं. केबीसीमधील अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा केबीसीमधील प्रश्न चर्चेत आला आहे.
केबीसीमध्ये 'मोनालिसा' संबंधित प्रश्न
कौन बनेगा करोडपती या क्विझ आधारित रिॲलिटी शो अमिताभ बच्चन सामान्य विज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारतात. मागच्या भागात विचारलेला असाच प्रश्न खूप चर्चेत आहे. हा प्रश्न लाखाचा प्रश्न नव्हता, केवळ 20 हजार रुपयांच्या या प्रश्नाने स्पर्धकांचा श्वास घेतला. लाइफलाइन वापरूनही स्पर्धकाला या प्रश्नाचे अचूक उत्तर देता आले नाही आणि तो केवळ 10,000 रुपये घेऊन घरी परतला.
स्पर्धकाने दिलं चुकीचं उत्तर
स्पर्धकाचे दुर्दैव म्हणजे केबीसीमध्ये स्पर्धक म्हणून खेळण्याची संधी मिळाली, पण फक्त तुटपुंजी रक्कम घेऊन माघारी परतावं लागलं. अमिताभ बच्चन यांनाही स्पर्धकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, त्यामुळे त्यांनाही वाईट वाटलं. केबीसीच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्सची विद्यार्थिनी सानिध्या हिने सहभाग घेतला होता. सानिध्या ही क्रीडाप्रेमी आहे आणि भविष्यात तिला क्रीडा डेटा विश्लेषक किंवा क्रीडा शास्त्रज्ञ व्हायचं आहे.
काय होता 20 हजारांचा प्रश्न?
'कौन बनेगा करोडपती 16' च्या नुकत्याच झालेल्या 19 वर्षीय स्पर्धक सानिध्या गुप्ताने फक्त 5 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. त्याने सहाव्या प्रश्नावर सगळंच संपलं आणि तिला फक्त 10,000 रुपये जिंकता आले. अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध मोनालिसा पेंटिंगशी संबंधित 20 हजार रुपयांचा प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर सानिध्याला माहित नव्हते, म्हणून तिने लाइफलाइन घेण्याचा निर्णय घेतला. लाईफ लाइन घेऊन योग्य उत्तर दिल्यास तिला किमान 10 हजार रुपये जिंकता आले असते. पण, त्यातही नशीबाने तिला साथ दिली नाही.
लिओनार्डो दा विंचीने मोनालिसा पेंटिंग कशावर रंगवली होती?
- लाकूड
- कागद
- कॅनव्हास
- कांस्य
योग्य उत्तर जाणून घ्या
सानिध्या गुप्ताने लाइफलाइन ऑडियन्स पोल वापरून सी कॅनव्हास हा पर्याय निवडला. 66 टक्के लोकांना ते बरोबर वाटलं, पण हे उत्तर चुकीचे निघालं. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए लाकूड आहे. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मोनालिसा पेंटींग लाकडावर रंगवण्यात आली होती. त्यामुळे चुकीच्या उत्तरानंतर सानिध्या निराश झाली.