KBC 13 : Amitabh Bachchan हे जया बच्चन यांच्यासोबत खोटे बोलतात का? बिग बींचे उत्तर ऐकून व्हाल थक्क
KBC 13 : केबीसीच्या प्रोमोमध्ये नीना गुप्ता बिग बींना विचारतात की ते जया बच्चन यांच्याशी खोटे बोलतात का? यावर अमिताभ यांनी असे उत्तर दिले की सगळेच अवाक झाले.
KBC 13 : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने या आठवड्यात 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर खास पाहुणे येणार आहेत. हे पाहुणे बिग बींना मजेदार किस्से ऐकवत आहेत. या आठवड्यात 'बधाई हो' सिनेमातील नीना गुप्ता आणि गजराज रावने 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर हजेरी लावली होती.
प्रोमोमध्ये नीना गुप्ता बिग बींना विचारत आहेत की ते जया बच्चन यांच्यासोबत खोटं बोलतात का? त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले,"मी दररोज माझ्या जोडीदारासोबत खोटे बोलतो". अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकून सगळेच हसायला लागतात.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन नीना गुप्ताला विचारतात,"एखादी गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कधी खोटं बोललात का?" यावर अमिताभ बच्चन उत्तर देण्याऐवजी गजराज रावांना म्हणतात,"तुम्ही आधी उत्तर द्या."
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले,"आमचं असं आहे की रोज खोटं बोलावं लागतं". यावर नीना गुप्ता आणि गजराज राव हसायला लागले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत.
संबंधित बातम्या
Katrina Kaif Changed Her Profile Pic : कतरिनाने बदलला प्रोफाईल फोटो, पती विकी सोबतचा रोमॅंटिक फोटो केला शेअर
येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे रंगणार एक तासाचे विशेष भाग
अजित दादांचा स्वॅगच लय भारी, विकी कौशलचं स्टारडमही पडलं फिकं, पाहा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha