(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kaun Banega Crorepati : संसाराच्या 50 वर्षानंतर Amitabh Bachchan यांनी सांगितलं Jaya Bachchan सोबत लग्न केल्याचं कारण; केबीसीच्या मंचावर खुलासा
Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.
Kaun Banega Crorepati 14 Promo : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अमिताभ आणि जया बच्चन (Jaya Bachchan) ही बॉलिवूडची परफेक्ट जोडी आहे. आता 'कौन बनेगा करोडपती 14'च्या (Kaun Banega Crorepati 14) मंचावर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. नुकत्याच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना दिसत आहेत. तसेच हॉटसीटवर बसलेली स्पर्धक प्रियांकाचं तिच्या केसांवरुन कौतुक करताना दिसत आहे.
प्रियांकाचे लांबलचक केस पाहिल्यानंतर बिग बी जुन्या आठवणीत रमले आणि त्यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न करण्याचं कारण सांगितलं. अमिताभ बच्चन म्हणाले,"जयाचे केस लांबलचक असण्याने मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला". बिग बींच्या उत्तराने चाहते खूश झाले.
View this post on Instagram
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. अमिताभ आणि जया 3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकले. आता पुढल्या वर्षी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. आता संसाराच्या 50 वर्षानंतर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्याचं कारण सांगितलं आहे.
अनेक दशकं गाजवलेले अमिताभ बच्चन आजही वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांचा 'ऊंचाई' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अमिताभ यांच्यासह अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या