Girish Oak :'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत येणार ट्विस्ट; डॉ. गिरीश ओक दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
Karan Gunhyala Mafi Nahi : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत डॉ. गिरीश ओक (Girish Oak) यांची एन्ट्री होणार आहे.
Girish Oak Entry In Karan Gunhyala Mafi Nahi Marathi Serial : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' (Karan Gunhyala Mafi Nahi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्मिते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत अभिनेते डॉ. गिरीश ओक (Girish Oak) यांची एन्ट्री होणार आहे. गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नेहमीच्या मालिकेपेक्षा निराळा विषय असल्यामुळे आणि मालिकेचा विषय थरारक असल्याने प्रेक्षकांचं या मालिकेवर जास्त प्रेम पाहायला मिळत आहे. मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळत आहे. आता या मालिकेत डॉ. गिरीश ओक यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेतील भोसले, जमदाडे आणि अनुजा हवालदार या पात्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमी निरनिराळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
View this post on Instagram
‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेत आता अभिनेते गिरीश ओक यांची एन्ट्री होणार आहे. वसंत रणदिवे असे या व्यक्तिरेखेचं नाव आहे. बऱ्याच काळाने मालिकेत पुनरागमन ते करत आहेत. मालिका रंजक वळणावर आली असताना त्यांची मालिकेत एन्ट्री होत आहे त्यामुळे मालिका आता काय वळण घेणार हे पाहायला मिळेल.
हरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच आता अश्विनी कासार हीसुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळत आहे. यांचे हे स्पेशल ओप्रेशन स्कॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिका जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
अश्विनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे आणि आता गिरीश ओक यांच्या येण्याने मालिका अजूनच थरारक आणि रंजक होणार हे नक्की. पाहायला विसरू नका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.
संबंधित बातम्या