Jui Gadkari : जुई गडकरी महिनाभरापासून आजाराने त्रस्त, तरीही मालिकेत करतेय काम, नेमकं झालं काय?
Jui Gadkari : टीआरपीच्या शर्यतीतही 'ठरलं तर मग'ही मालिका अव्वलस्थानी आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीबाबत सध्या मोठी अपडेट समोर आली आहे.
Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. सध्या तिची 'ठरलं तर मग' ही मालिका सुरू असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag)ही मालिका अव्वलस्थानी आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीबाबत (Jui Gadkari) सध्या मोठी अपडेट समोर आली आहे. जुई गडकरी ही महिनाभरापासून आजारी आहे. आजारी असूनही ती मालिकेत काम करत आहे.
जुई गडकरी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुई गडकरी चाहत्यांशी संवाद साधत असते. जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले. एका चाहत्याने ताई तू आजारी आहेस का, 'ठरलं तर मग'मध्ये तुझा आवाज वेगळा येत आहे, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना जुई गडकरीने आपण आजारी असल्याचे मान्य केले. घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल असेही तिने सांगितले. एका चाहत्याने जुईला आता तुमची तब्येत कशी आहे, असे विचारले. त्यावर तिने 'अजून तब्येतीत सुधारणा होते आहे, मध्येच मी म्युट मोडमध्ये जाते आहे' असे उत्तर दिले. तिच्या या उत्तरानंतर जुई गडकरी आजारी असल्याचे समोर आले आहे.
मागील काही एपिसोडस पासून मालिकेत जुईच्या आवाजात वेगळेपण जाणवत आहे. ही बाब चाहत्यांच्याही लक्षात आली. त्यामुळे त्यांनी लाईव्ह सेशनमध्ये जुईला तिच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारले.
View this post on Instagram
जुई गडकरीला काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे इंडस्ट्रीतून मोठा ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर जुईने जोमात कमबॅक केले. स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेतून तिने पदार्पण केले होते. या मालिकेत जुईने कल्याणी ही व्यक्तीरेखा साकारली होती. 2017 मध्ये सुरू झालेली मालिका जवळपास पाच वर्ष सुरू होती.