Dolly Sohi Death : आधी बहिणीनं जग सोडलं, त्यापाठोपाठ 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्रीनंही शेवटचा श्वास घेतला; टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा
Dolly Sohi Death : 'कुमकुम भाग्य' आणि 'देवो के देव महादेव' यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही हिचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री तिची बहीण अभिनेत्री अमनदीपचेही अखेरचा श्वास घेतला.
Dolly Sohi Death : 'कुमकुम भाग्य' आणि 'देवो के देव महादेव' यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही (Dolly Sohi Death) हिचे निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून तिची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. डॉलीच्या निधनाआधीच तिची बहीण अमनदीपचे कावीळने निधन झाले. अमनदीप ही देखील अभिनेत्री होती. दोन्ही मुलीच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सर्वाइकल कॅन्सरने निधन
डॉली सोहीच्या कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या निधनाची माहिती न्यूज पोर्टल ई-टाइम्सवर शेअर करत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी लिहिले, "आमची मुलगी डॉलीचे आज सकाळी निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने आम्हाला पूर्ण धक्का बसला आहे. आज तिच्यावर अंत्य संस्कार केले जातील."
'भाभी', 'कलश', 'देवो के देव महादेव' सारखे कार्यक्रमातून अभिनेत्री डॉली सोही घराघरात लोकप्रिय झाली. बऱ्याच दिवसांपासून सर्वाइकल कॅन्सरसोबत तिच्यावर उपचार सुरू होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
बहीण अभिनेत्री अमनदीपचे निधन
View this post on Instagram
डॉलीने अखेरचा श्वास घेण्याआधी काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री तिची बहीण अमनदीप सोही हिचे कावीळच्या आजाराने निधन झाले. अमनदीप सोही ही देखील अभिनेत्री होती. 2000 साली तिने कलश या मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर कमास, कुसुम, भाभी, तुझ संग प्रीत लगाई सजना, हिटलर दीदी, देवों के देव महादेव आदी मालिकेत ती झळकली होती. झनक या मालिकेत ती शेवटची झळकली होती.