एक्स्प्लोर
Advertisement
'लागिरं...'मधल्या ओरिजनल जयडीची नवी मालिका, किरण ढाणे पोलिसाच्या भूमिकेत
किरण यापूर्वी 'लागिरं झालं जी'मध्ये खलनायिकेची भूमिका साकारत होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. मात्र निर्मात्यांसोबत झालेल्या वादानंतर जयडी अर्थात किरण ढाणे आणि मामी म्हणजेच विद्या साळवे यांनी मालिका अचानक सोडली होती.
मुंबई : झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेत जयडीच्या भूमिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी किरण ढाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' या नव्या मालिकेत ती दिसणार आहे. या मालिकेत किरण ढाणे खाकी वर्दीत दिसणार असून ती अवनी नावाच्या डॅशिंग महिला पोलिसाची भूमिका साकारणार आहे. तर किशोर कदम तिच्या बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरुन निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेही अपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे मालिकेतून उलगडत जाणार आहे. 11 मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका पाहता येणार आहे.
या मालिकेचं शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनी आवाज दिला आहे. तर एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मालिकाविश्व समृद्ध करणाऱ्या अशोक पत्की यांचं संगीत गीताला लाभलं आहे.
"यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. 'एक होती राजकन्या'च्या निमित्ताने, एका खंबीर मुलीची भूमिका मला साकारायला मिळत आहे. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल," असा विश्वास किरणने व्यक्त केला आहे. दरम्यान, किरण यापूर्वी 'लागिरं झालं जी'मध्ये खलनायिकेची भूमिका साकारत होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. मात्र निर्मात्यांसोबत झालेल्या वादानंतर जयडी अर्थात किरण ढाणे आणि मामी म्हणजेच विद्या साळवे यांनी मालिका अचानक सोडली होती. EXCLUSIVE : मामी आणि जयडी यांनी 'लागिरं झालं जी' मालिका का सोडली?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement