एक्स्प्लोर

Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीकडून पॅडी कांबळेंवर लाजिरवाणं भाष्य; नेटकऱ्यांनी झोडपलं, 'बिग बॉस'ने आता...

Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली आहे.

Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या  (Bigg Bos Marathi Season 5) घरात चौथ्या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी सत्याचा पंचनामा हा टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये वादावादी झाली. ग्रुप ए मध्येही आपआपसात वाद झाले. तर, दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) पु्न्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरात 'सत्याचा पंचनामा' या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर अपमानास्पद वक्तव्य केले. आपल्या ग्रुपचा डाव समोरची टीम उधळून लावत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रुप ए मध्ये चलबिचल सुरू झाली होती. त्यातच त्यांच्यात खटकेही उडू लागले होते. टास्कच्या दरम्यानच्या वेळेत जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.” असे म्हटले. 

जान्हवीचा उद्धटपणा...

पॅडी कांबळेंच्या करिअरवर भाष्य केल्यानंतर आर्या जाधव ही गार्डन एरियामध्ये बसलेल्या जान्हवीला जाब विचारते. त्यावर जान्हवी ही मग्रूरपणे तिला “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” असे म्हणते. “तू जेवढं काम केलं नाहीये…तेवढी त्यांनी अ‍ॅक्टिंग केलीये. त्यांचा एक स्टेटस आहे…त्यांनी खूप काम केलंय त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेलं भाष्य ऐकून घेणार नाही, असे आर्या जान्हवीला म्हणते. पण,  जान्हवी तिच्याकडे कुत्सितपणे पाहते आणि जा तुझ्या गँगला घेऊन ये असे म्हणते. 

जान्हवीने पुन्हा पातळी ओलांडली, नेटकरी संतापले...

वीकेंडला होणाऱ्या  'भाऊचा धक्का' कार्यक्रमात शोचा होस्ट रितेश देशमुखने याआधी  जान्हवी किल्लेकरला तिच्या वागण्याबाबत आणि इतरांना अपमानास्पद बोलण्याबाबत खडे बोल सुनावले होते. कोणीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं रितेशने स्पष्ट केले होते. त्यानंतरही जान्हवीने आता पुन्हा एकदा पॅडी कांबळे यांच्या करिअरवर भाष्य केले.

जान्हवीच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. जान्हवीला आता बिग बॉस घराबाहेर काढणार का, असा सवालही प्रेक्षकांनी विचारला आहे. एका युजरने म्हटले की, बिगबॉसची लाडकी आहे ती. तिला सर्व माफ आहे. काहीही बोला सर्व माफ आहे.. बिगबॉस फक्त टीम अ मुळे चालू आहे असे बिगबॉसचे मत आहे असे म्हटले. तर, जान्हवीला कित्येक वेळा समजून सुद्धा काही फरक नाही पडला. बिग बॉस चूक आणि बरोबर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. एवढे मोठे अभिनेते ह्याचं वारंवार अपमान होतोय तरी ह्यांना काहीच फरक पडत नाही. टीआरपीसाठी एखाद्याची लायकी काढणे हे चुकीचे असल्याचे आणखी एका युजरने म्हटले.  वर्षा मॅडम, पॅडी सर यांच्या कारकिर्दीवर भाष्य करणे खरच अशोभनीय आहे. प्रत्येक शनिवारी रविवारी रितेश सरांनी समजून सुध्दा निक्की आणि जान्हवी यांच्यात काही फरक पडलेला दिसत नाही असा मुद्दाही एकाने मांडला. 'बिग बॉस' तिला काढणार नाही कारण टीआरपीसाठी ती महत्त्वाची असल्याकडे एका नेटकऱ्याने लक्ष वेधले. 

Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीकडून पॅडी कांबळेंवर लाजिरवाणं भाष्य; नेटकऱ्यांनी झोडपलं, 'बिग बॉस'ने आता...

Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीकडून पॅडी कांबळेंवर लाजिरवाणं भाष्य; नेटकऱ्यांनी झोडपलं, 'बिग बॉस'ने आता...

Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवीकडून पॅडी कांबळेंवर लाजिरवाणं भाष्य; नेटकऱ्यांनी झोडपलं, 'बिग बॉस'ने आता...

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात 'सत्याचा पंचनामा' या टास्क दरम्यान एकाही सदस्याला बीबी करन्सी कमावता आली नाही. त्यामुळे याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा बिग बॉसने दोन्ही टीमला दिला आहे. त्यामुळे बिग बॉस नेमकं काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Embed widget