Aai Tuljabhavani Marathi Serial Track: आई तुळजाभवानी मालिका मिळाली ही देवीचीच इच्छा; अभिनेत्री पूजा काळेनं व्यक्त केली कृतज्ञता
Aai Tuljabhavani Marathi Serial Track: लहाणपणापासून सुरू असलेला नृत्याचा रियाज आणि माझी नृत्याची प्रचंड आवड यामुळे मालिका करताना जेव्हा कुठे नृत्याचा टेक असेल तेव्हा मी खूप खुश असते, असं अभिनेत्री पूजा काळे म्हणाली.

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani) या मालिकेत बालगणेशाचे आगमन झाले आहे. अशोक सुंदरी आणि गणेश मिळून कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. फार कमी वेळातच आई तुळजाभवानी मालिकेनं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. अशातच या मालिकेत देवी तुळजाभवानीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री पूजा काळे हिनं आपला मालिकेतील अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीत बोलताना आई तुळजाभवानी मालिका (Aai Tuljabhavani Serial) मिळाली ही देवीचीच इच्छा असल्याचं अभिनेत्री पूजा काळेनं (Actor Pooja Kale) म्हटलं आहे.
अभिनेत्री पूजा काळे म्हणाली की, "अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरजमधून भरत नाट्यम नृत्यात विशारद पूर्ण करून अलंकार करीत आहे. अगदी तीन वर्षाची होते तेव्हा पासुनच आमच्या नटराज नृत्यालयाच्या वार्षिक नृत्यउत्सवात नृत्याचे स्टेज परफॉर्मन्स करत आले आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्याबरोबर संपूर्ण भारतातील लोकनृत्य करायला मिळाले. इतकेच नाही तर वेस्टर्न नृत्य ही त्यामुळे शिकायला मिळाले. गुरू मुक्ताबाला जोशी आणि गुरू अमृता साळवी यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. तसेच मी नृत्याचे अनेक प्रकार सादर करते ज्यात ओडिसी, मोहिनियत्तम, कुचीपुडी नृत्यदेखील मी करते. पण, नृत्यासोबतच शास्त्रीय गायन मी श्री मनोज माळी ह्यांच्याकडे शिकले आहे."
लहाणपणापासून सुरू असलेला नृत्याचा रियाज आणि माझी नृत्याची प्रचंड आवड यामुळे मालिका करताना जेव्हा कुठे नृत्याचा टेक असेल तेव्हा मी खूप खुश असते. अभिनयासाठी हावभाव करताना नृत्याचा फायदाच होता. पौराणिक कथांचे नृत्यामध्ये आम्ही सादरीकरण करतो. अशावेळी अंग, प्रत्यंग, उपांगाचा वापर होऊन नवरस सादर करतो. ती सवय असल्यानं अभिनय करायला सोपं जातं. आई तुळजाभवानी मालिकेची विचारणा जेव्हा झाली, तेव्हा माझ्या मनात चटकन उत्तर आलं होतं. नक्कीच करायची आहे मला ही मालिका... कारण तुळजाभवानीसोबत माझ्या घराचं जुनं नातं आहे, आमची ती कुलस्वामिनी आहे. नृत्यात मी अनेकदा तांडव सादर केलं आहे. पण, साक्षात तेच साकारायला मिळणं, हे मी माझं भाग्य समजतं. आई तुळजाभवानी मालिकेसाठी 350 ते 400 हुन अधिक ऑडिशन घेतल्या गेल्या होत्या, ज्यातून माझी निवड झाली. माझ्या नशिबात ही मालिका लिहिली होती, असं म्हणायला हरकत नाही. देवीचीच इच्छा असावी म्हणून माझ्यापर्यंत ही मालिका आली, असं अभिनेत्री पूजा काळे म्हणाले.
View this post on Instagram
मालिकेत तांडव ऑन द स्पॉट केलं : पूजा काळे
जेव्हा मला कळलं मालिकेत असं आहे, तेव्हा पहिलं तर मी खूप खुश झाली. कारण नृत्य हा माझा खूपच जवळचा विषय आहे आणि आता मला ते मालिकेत सादर करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे मला खुपचं आनंद झाला. शूटिंग आणि प्रत्यक्षात सादर करणे यात निश्चितच खूप फरक आहे. पण, मालिकेत तांडव मी ऑन द स्पॉट केलं होतं. मला आमचे दिगदर्शक सर बोले की तांडव सादर करायचा आहे कधीपर्यंत प्रैक्टिस करुन आपण शूट करुयात. तेव्हा मी म्हणाले ऑन द स्पॉट केले तरी चालेल. मी तांडव सादर करण्याआधी अजिबात रियाझ केला नाही कदाचित देवीनेच मला तेव्हा बळ दिलं, असं अभिनेत्री पूजा काळे म्हणाली.
अभिनेत्री पूजा काळे म्हणाली की, "आई नृत्य दिगदर्शक असल्याने अनेक म्युझिक अल्बममध्ये तिच्या विद्यार्थ्यांन सोबत नृत्य सादर केलं आहे. तेव्हा मी सतत तिच्या बरोबर असायचे... त्यामुळे कोळी नृत्य, जागरण गोंधळ, जोगवा, पाहत आले आहे आणि करतही आले आहे. शास्त्रीय नृत्याची माझी गुरू अर्थात माझी आई राजश्री काळे आहे. श्री विक्रमन पिल्लई, श्री दीपक मुजूमदार हे माझे गुरू."
तांडव किंवा कोणतेही नृत्य करायचे असल्यास, मी खूप जास्त उत्सुक असते : पूजा काळे
नृत्य शिकत असताना आपल्याला वेळात वेळ काढावाच लागतो. मला नृत्याची खुप आवड आहे, त्यामुळे मालिकेच्या हेक्टिक Schedule मधून मी रियाझासाठी थोडा वेळ तरी काढते. मालिकेमध्ये तांडव किंवा कोणतेही नृत्य करायचे असल्यास, मी खूप जास्त उत्सुक असते. मी जवळ जवळ सगळेच डान्स स्टाईल शिकले आहे, त्यामुळे मला खूप सोप्प पडतं, असं अभिनेत्री पूजा काळे म्हणाली.
























