Jui Gadkari: 'डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत...'; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत नुकतीच अभिनेत्री जुई गडकरीनं (Jui Gadkari) एक पोस्ट शेअर केली आहे.
Jui Gadkari: रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर (Lrshalwadi Landslide) काल रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. दरडीखाली 30 ते 40 घरं दबली आहेत, असा अंदाज लावला जात आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत नुकतीच अभिनेत्री जुई गडकरीनं (Jui Gadkari) एक पोस्ट शेअर केली आहे. 'सगळे सुखरुप असुदेत' अशी प्रार्थना जुईनं या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
जुई गडकरीची पोस्ट
इर्शाळगडवरील (Irshalgad) काही फोटो शेअर करुन जुईनं पोस्टमध्ये लिहिलं, 'इर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी. सकाळपासुन ईर्शाळवाडी वर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्न झालंय. तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय. एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी. विज नाही. मेडीकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठकरवाडीत काहीच नाही. तरीही सदैव चेहरा हसरा. कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला १-1.30 तास चढुन वर जाणं किती अवघड आहे. पण तरीही कसलीही complaint नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं. माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या. कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये. त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलीये. बातमी बघुन खुप वाईट वाटलं. सगळे सुखरुप असुदेत.' जुई गडकरी ही सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जुई ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.
इर्शाळवाडी हा आदिवासी पाडा असून डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, दादा भुसे तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबात ट्वीट शेअर केलं. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळगड गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. आज पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले. '
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: