एक्स्प्लोर
'कसौटी जिंदगी की'च्या रिमेकमध्ये हीना खान कमौलिका?
अभिनेत्री हीना खान 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये कमौलिकाची भूमिका करणार असल्याच्या चर्चा आहेत.
मुंबई : एकता कपूर लवकरच 'कसौटी जिंदगी की' या आपल्या मालिकेचा रिमेक घेऊन येत आहे. या मालिकेतील लीड कपलइतकीच कोमोलिका ही खलनायिकेची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. अभिनेत्री हीना खान 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये ही भूमिका करणार असल्याच्या चर्चा आहेत.
अनुराग-प्रेरणाची प्रेम कहाणी 17 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. अनुराग आणि प्रेरणा इतकीच त्यांच्या आयुष्यात खोडा घालणाऱ्या कोमोलिकाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. कोमोलिका केसांच्या बटांमध्ये बोट फिरवताना सोबत वाजणारं बॅकग्राऊण्ड म्युझिक चाहते अजूनही विसरलेले नाहीत.
पहिल्या सिझनमध्ये शेजान खानने अनुराग, तर श्वेता तिवारीने प्रेरणाची भूमिका केली होती. उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे उर्वशीची मनोरंजन विश्वात धडाक्यात एन्ट्री झाली.
कोमोलिका हे टेलिव्हिजनच्या इतिहासातील अतुलनीय खल पात्र आहे. त्यासाठी उर्वशीला रिप्लेसमेंट मिळणं अशक्य असल्याचं खुद्द एकता कपूरच मान्य करते. मात्र रिमेकमध्ये उर्वशी नसेल, हेसुद्धा उघड आहे.
'कसौटी जिंदगी की 2' मध्ये कोमोलिकाची भूमिका कोण करणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. हीना खान ही व्यक्तिरेखा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कोमोलिकासाठी रेहाना मल्होत्रा, मधुरिमा तुली या अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. एकताने मात्र या भूमिकेसाठी आपल्या डोक्यात एकच व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. ती अभिनेत्री हीना खान असल्याचं मानलं जातं.
Even though there will b a reboot in her character ... it’ll b a v difficult casting for this iconic antagonist! So first choice will b hopefully d last choice JAI MATA DI
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) July 11, 2018
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत हीनाने साकारलेल्या अक्षराच्या भूमिकेमुळे तिची सोज्वळ इमेज निर्माण झाली होती. त्यानंतर 'बिग बॉस'मध्ये हीनाने फायनल गाठून स्वतःची वेगळीच इमेज घडवली. 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये एरिका फर्नांडिस प्रेरणाची भूमिका करणार आहे. तर अनुरागच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरु आहे.So many sources claiming so many actors in this epic characters casting’ I habe aproached only one person n she is d ONLY CHOICE
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) July 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement