एक्स्प्लोर

Hemangi Kavi: 'तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना'; हेमांगीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

हेमांगीनं (Hemangi Kavi)  नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं खास कॅप्शन देखील दिसं आहे.

Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi)   ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. हेमांगीनं नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं खास कॅप्शन देखील दिसं आहे.

हेमांगीनं सोशल मीडियावर तिचा जुना फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,  'हा आमचा Family photo! माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी! पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photo त. लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले photos/ album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं! आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!'

'मी पण या सगळ्याला अपवाद नाही. मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की, मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तू पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई? माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे! तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो? '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हेमांगी ही सध्या तिच्या जन्मवारी या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकामध्ये ती मंजिरी ही भूमिका साकारत आहेत.


संबंधित बातम्या

Hemangi Kavi : 'मन धागा धागा’ मालिकेच्या सेटवर हेमांगी कवीला झाली दुखापत; फोटो शेअर करत म्हणाली, 'दुःख, यातना, क्लेश...'

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget