Hardeek Joshi: हार्दिक जोशीचा 'जाऊ बाई गावात' हा नवा रिअॅलिटी गेम शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमोनं वेधलं लक्ष
Hardeek Joshi: लवकरच हार्दिकचा 'जाऊ बाई गावात' हा नवा रिअॅलिटी गेम शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Hardeek Joshi: अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) हा विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. लवकरच हार्दिकचा 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) हा नवा रिअॅलिटी गेम शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे काही प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत. या प्रोमोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहेत.
'जाऊ बाई गावात' या रिअॅलिटी गेम शोच्या एका प्रोमोमध्ये एक तरुणी ही नखांना नेसपॉलिश लावताना दिसत आहे. त्यानंतर ती तरुणी ही शेण सारवण्याचा प्रयत्न करते. "शेणानं घर सारवणं, नेलपॉलिश लावण्याइतकं सोप्पं नसतं!" असं हार्दिक जोशी या प्रोमोमध्ये म्हणताना दिसत आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
तसेच 'जाऊ बाई गावात' या रिअॅलिटी गेम शोचे आणखी दोन प्रोमो देखील रिलीज करण्यात आले आहेत. त्यामधील एका प्रोमोला, "गावात गुरांसोबत झोपणं, टेडिबेअरसोबत झोपण्याइतकं सोप्पं नसतं.." असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या प्रोमोला आत्ता मज्जा येणार....! 'जाऊ बाई गावात'.खेळ सुरु होणार लवकरच..." असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
View this post on Instagram
'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील हार्दिकनं साकारलेल्या राणादा या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हार्दिकचा चाहता वर्ग मोठा आहे. तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेमधून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच त्याचा लवकरच 'क्लब 52' (Club 52) हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे.हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी 'क्लब 52' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. हार्दिकच्या आगामी मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच हार्दिकच्या 'जाऊ बाई गावात' या रिअॅलिटी गेम शोची देखील चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hardeek Joshi : राणादा म्हणतोय,"खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते"; नेमकं प्रकरण काय?