Gautami Deshpande: 'हे लज्जास्पद ...'; फूड ऑर्डर चोरीला गेल्यानं गौतमीनं व्यक्त केला संताप
गौतमीनं (Gautami Deshpande) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
Gautami Deshpande: मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही सोशल मीडिया सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट गौतमी सोशल मीडियावर शेअर करते. गौतमीनं नुकता एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. हा व्हिडीओ शेअर करुन गौतमीनं तिची फूड ऑर्डर चोरीला गेल्याची माहिती दिली. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधलं.
गौतमीची पोस्ट
गौतमीनं तुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन गौतमीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी आज तिरामिसूची ऑर्डर दिली. जवळपास 1 तास वाट पाहिल्यानंतर मी डिलिव्हरी देणाऱ्या माणसाला पार्सल तपासण्यासाठी कॉल केला. त्यानंतर मला ते पार्सल चोरीला गेल्याचे समजले. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही पण नंतर डिलिव्हरी देणाऱ्या माणसाने मला व्हिडिओ पाठवला. एखाद्याचे अन्न चोरणे आणि हसणे हे किती लज्जास्पद आहे.' गौतमीच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
गौतमीच्या पोस्टला नेटकऱ्यांच्या कमेंट्स
'लोक किती खालच्या पातळीवर गेली आहेत.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं गौतमीच्या पोस्टाला केली. तर एका युझरनं लिहिलं, 'जाऊ देत पोटात दुखेल त्यांच्या' गौतमीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी, माझा होशील ना या मालिकांमध्ये देखील गौतमीनं काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: