'तारक मेहता..'मधली कोमल हाथी एका एपिसोडसाठी घेतात 'एवढी' फीस, 15 वर्षांपासून करतायत काम
डॉक्टर हाथी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री चहात्यांना कायमच आवडते पण पंधरा वर्षांपासून ही भूमिका साकारणाऱ्या कोमल भाभी म्हणजेच अंबिका रंजनकर या एका एपिसोडचे किती पैसे घेतात माहिती का?
Tarak Mehta Ka Ulta Chashma: तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस पडत आलेला आहे. टीव्हीवर जवळपास 15 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. या मालिकेतला प्रत्येक पात्र लोकांच्या लक्षात राहणारं आहे. जेठालाल दया यांच्यासह यातले सहकलाकार असणारे डॉक्टर हाथी आणि त्यांची पत्नी कोमल भाभी यांनीही प्रेक्षकांना त्यांच्या गोंडस स्वभावाने भुरळ घातली आहे. डॉक्टर हाथी यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या कोमल भाभी म्हणजेच अंबिका रंजनकर यांचाही मोठा फॅन बेस आहे. चहात्यांना त्यांच्याविषयी अनेक गोष्टी माहित असतील. डॉक्टर हाथी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री चहात्यांना कायमच आवडते पण पंधरा वर्षांपासून ही भूमिका साकारणाऱ्या कोमल भाभी म्हणजेच अंबिका रंजनकर या एका एपिसोडचे किती पैसे घेतात माहिती का?
कोमल भाभी घेतात एका एपिसोडची एवढी फीस
तारक मेहता का उल्टा चश्मा ही 2008 मध्ये टीव्हीवर सुरू होणारी मालिका आजही प्रेक्षकांना तुफान आवडते. यातील कलाकारांच्या भूमिका आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. मीडिया रिपोर्टनुसार, अंबिका रंजनकर या एका एपिसोड साठी 30000 फीस घेतात. अधिकृतरित्या तशी माहिती नसली तरी त्यांचे कोस्टार निर्मल सोनी प्रत्येक एपिसोड मागे 25000 फीस चार्ज करतात असं सांगण्यात येतं. जर या दोघांची तुलना केली तर कोमल भाभींची फीस ही अधिक असल्याचं दिसतं. कोमल भाभी म्हणजेच रंजना या सोशल मिडियावरही ॲक्टीव्ह आहेत. हसमुखसोबत ती अनेक रील्स पोस्ट करत असते.
View this post on Instagram
अंबिका रंजनकर व्हॉईस ओवर आर्टिस्ट
तारक मेहता का उल्टा चष्माश गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. हा शो लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेषतः त्यातील पात्रांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. शोमधील सर्वच व्यक्तिरेखा स्वतःच खूप प्रसिद्ध आहेत.तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत डॉक्टर हाथी यांच्या पत्नीची म्हणजेच कोमल भाभी यांची भूमिका गेली पंधरा वर्षे साकारतात. पण एक्टिंग शिवाय अंबिका रंजनक्रिया एक वॉईस ओवर आर्टिस्ट ही आहेत. त्यांनी ये यार घरी ये मेरा घर का, हैला कौन है जवाब, हसते खेलते, या मालिकांमध्ये काम करत करत अनेक प्रोजेक्टसाठी त्यांनी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.