Disha Parmar And Rahul Vaidya: थाटात पार पडलं राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लेकीचं बारसं; बाळाचं नाव माहितीये?
दिशा (Disha Parmar) आणि राहुल (Rahul Vaidya) यांनी त्यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन राहुल आणि दिशानं त्यांच्या मुलीच्या नावाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
Disha Parmar And Rahul Vaidya: अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या लेकीचं बारसं नुकतेच पार पडले आहे. दिशा आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन राहुल आणि दिशानं त्यांच्या मुलीच्या नावाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
दिशा आणि राहुल यांचा खास लूक
दिशा आणि राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये राहुल, दिशा आणि त्यांची मुलगी खास लूकमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये दिशा ही गोल्डन आणि पिंक कलरची साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे तर राहुल हा ब्लू कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. दिशा आणि राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची मुलगी पिंक फ्रॉक आणि डोक्यावर पिंक कलरचा बेल्ट अशा लूकमध्ये दिसत आहे.
राहुल आणि दिशा यांच्या लेकीचं नाव
दिशा आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'नव्या' असं ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अनेक जण दिशा आणि राहुल यांच्या लेकीच्या नावाचं कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
राहुल आणि दिशा यांनी 16 जुलै 2021 रोजी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याच्या घरी गोंडस मुलीचे आगमन झालं आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन राहुल आणि दिशा यांनी ही आनंदाची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, "आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. बाळाची मम्मी आणि बाळ दोघेही हेल्दी आहेत. आम्ही आमच्या Gynaec चे आभार मानू इच्छितो. ज्यांनी गर्भधारणेपासून बाळाच्या जन्मापर्यंत सर्व गष्टींकडे विशेष लक्ष दिले. आमच्या कुटुंबाचे देखील विशेष आभार".
'बडे अच्छे लगते हैं 3' या मालिकेमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर गायक राहुल वैद्यनं बिग बॉस-14 मध्ये सहभाग घेतला होता. दिशा आणि राहुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
View this post on Instagram
संबंधित बातम्या:
Disha Parmar: गायक राहुल वैद्य झाला बाबा; दिशा परमारनं दिला मुलीला जन्म