एक्स्प्लोर

Dipika Kakar : दीपिका कक्करचा अभिनय क्षेत्राला रामराम? चर्चांवर मौन सोडत अभिनेत्री म्हणाली,"बाळाच्या जन्मानंतरच..."

Dipika Kakar : दीपिका कक्कर अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.

Dipika Kakar On Quit Acting Rumours : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि शोएब इब्राहिम लवकरच आई-बाबा होणार आहेत. बाळाच्या स्वागतासाठी आता दोघेही सज्ज आहेत. आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याच्या चर्चांवर दीपिका कक्करने सोडलं मौन

दीपिका म्हणाली,"मी अभिनय क्षेत्राला रामराम करणार नाही. पण बाळाच्या जन्मानंतर काही वर्ष मात्र मी छोट्या पडद्यापासून ब्रेक घेणार आहे. पूर्णपणे आईपण अनुभवण्याची माझी इच्छा आहे. सततच्या मालिकांमुळे कुटुंबियांसोबत वेळ घातवता येत नव्हता. त्यामुळे आता कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची माझी इच्छा आहे. पण याचा अर्थ मी अभिनय क्षेत्र सोडलं असा होत नाही". 

दीपिका पुढे म्हणाली,"बाळाच्या जन्मानंतर जर मला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली तर मी नक्कीच विचार करेल. पण काम करायचं की नाही करायचं हा निर्णय मी बाळाच्या जन्मानंतरच घेईल. मला वाटतं आईने तिच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा". 

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम 2018 साली लग्नबंधनात अडकले. 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. दीपिका आणि शोएब यांच्यात खूप चांगली मैत्री होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका आणि शोएबने एक खास पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. त्यांनी लिहिलं होतं,"कृतज्ञता, आनंद, उत्साह अशा वेगवेगळ्या भावनांनी ही बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहोत. लवकरच आम्ही आई-बाबा होणार आहोत. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दीपिका कक्कर कोण आहे? (Who Is Dipika Kakar)

'दीपिका कक्कर' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) या मालिकेच्या माध्यमातून दीपिका घराघरांत पोहोचली. सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस 12'चीदेखील (Bigg Boss 12) ती विजेती होती. 

संबंधित बातम्या

Dipika Kakar: लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका-शोएब होणार आई-बाबा; पोस्ट शेअर करुन दिली गुडन्यूज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget