एक्स्प्लोर

Nikki Tamboli Conversation: डीपीदादानं निक्कीला डिवचलं; निक्कीनं थेट अभिजीतलामध्ये ओढलं, मग पुढे काय झालं?

Nikki Tamboli Conversation: अरबाजच्या जाण्यानं निक्की आता एकटी पडल्याचं पाहायला मिळत आहे. तर, घरातले सदस्य तिला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत.

Nikki Tamboli Conversation : पहिल्या दिवसापासून अख्ख्या घराला आपल्या तालावर नाचवणाऱ्या निक्कीला (Nikki Tamboli) आता घरातले सदस्य कुठेतरी कोंडीत पकडताना दिसणार आहेत. आजच्या भागात घरातले बेडरुममध्ये निवांत बसलेले असताना जेवणावरुन विषय निघतो. दोन आठवड्यांपूर्वी निक्कीनं घरातील कामांवरुन धुमाकूळ घातला होता. मी घरातली काहीच कामं करणार नाही, असा एल्गार निक्कीनं पुकारला होता. त्यामुळे घरातल्यांनीही तू काम करणार नाहीतर, आम्ही बनवलेलं जेवण तुला देणार नाही... तुझं तू करुन खा, असं स्पष्ट सांगितलं. तोच विषय पुन्हा येतो. त्यावरुन पॅडिदादा (Pandharinath Kamble) निक्कीनं घेतलेल्या निर्णयावेळी ठरलेल्या गोष्टीची आठवण करुन देतात. 

पॅडिदादांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाची आठवण करुन दिल्यानंतर डिपीदादा (Dhananjay Powar) मध्ये बोलतात. तर जान्हवी थोडी मवाळ भूमिका घेत, आपण बनवलेलं जेवण खाऊ देत, खाण्याच्या बाबतीत नको असं सांगते, तर त्यावर डिपी दादा निक्कीला थेट डिवचायला सुरुवात करतात. आपल्या घरात एक न कमावता फुकट बसून खाणारी व्यक्ती असते, असं म्हणत निक्कीला थेट टोला लगावतात. या संभाषणात अभिजीत फक्त डिपी दादांच्या बाजूला बसलेला असतो. निक्की थेट अभिजीतला मध्ये ओढत, अभिजीतनं अशी व्यक्ती पाहिली असेल, असं म्हणते... त्यानंतर अभिजीत मुकाट हो अशी मान डोलावतो. त्यानंतर पुन्हा डीपी दादा तू त्याचं सारखं नाव घेऊन त्याला भिती दाखवतेयस का? असं म्हणतात. त्यावर निक्की अभिजीतला विचारते तुझं नाव मी घेतलं तर तुला प्रॉब्लेम आहे का? अभिजीत पुन्हा मुकाट नाही अशी मान डोलावतो.

डिपीदादा निक्कीला डिवचताना नेमकं काय म्हणाले...? 

पॅडी दादा : पण ठरलंय ना, ती काही काम करणार नाही... ती तिचं तिचं बनवणार म्हणून... 

निक्की : हे तुम्ही ठरवलंय, तिनं नाही... तुमचं मत वेगळंय, तिचं मत वेगळंय... 

डिपी दादा : तिनं ठरवलंय का? तिचं तिचं करणार म्हणून... 

पॅडी दादा : तुम्ही जेवण बनवणारे आहात... तुम्ही कॉल घ्या मग... 

जान्हवी : दादा.... दादा... खाऊ देत... खाण्याचं काय?... 

डिपी दादा : खाऊ देत... खाऊ देत... पोटभर टाकू आपण... आपल्या घरात एक व्यक्ती असते माहितीय का? पॅडीदादा... जो कमवत नसतो, पण खात असतोय... त्याला रात्री कधी धूसमूस धूसमूस करून रडताना पाहिलंयस काय? कसे असतात ना त्याचे विचार.... 

निक्की : अभिजीतनं बघितलं असेल... काय अभिजीत बघितलं असेल ना असा व्यक्ती... 

अभिजीतनं हो अशी मान डोलावली... 

डिपी दादा : हो म्हटला की... तू सारखं त्याचं नाव घेऊन काय त्याला भ्या घालतीस? 

निक्की : माझं तोंड... त्याचं नाव... त्याला प्रॉब्लेम आहे का? असेल तर मी तुझं नाव नाही घेणार... तुला आहे का? प्रॉब्लेम मी तुझं नाव घेते किंवा मी तुझ्याशी बोलते... 

अभिजीतनं नाही अशी मान डोलावली... 

निक्की : ठिक आहे... थँक्यू...! 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अरबाज पटेल एलिमिनेट, निक्की एकटी पडणार? 

बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यासाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट होते. यंदाच्या आठवड्यात रितेश देशमुख नसल्यामुळे बिग बॉसनी एलिमिनेशन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये प्रत्येक सदस्यासमोर एक बॅग ठेवली होती. त्यामध्ये सेफ असं कार्ड ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सूरज, जान्हवी आणि वर्षाताई हे तिघेजण सेफ झाले. पण निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. यामध्ये अरबाजचा खेळ संपला असल्याचं बिग बॉसनं जाहीर केलं. त्यानंतर निक्की ओक्साबोक्सी रडताना दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून निक्की घरातल्यांना आता आम्ही दोघंच आहोत. आता तुम्ही तुमच्यामधल्यांना बाहेर काढणार, आम्ही दोघ सळोकी पळो करुन सोडू तुम्हाला असं बोलताना दिसत होती. पण अरबाज गेल्यामुळे निक्की आता एकटी पडणार की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bigg Boss Marathi : तुझं कुणी न्हाय, मी हाय ना..., अरबाजच्या एग्झिटनंतर एकट्या पडलेल्या निक्कीला सूरजचा आधार, म्हणाला... "तुझा फोकस..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?? रुसवे फुगवे असेल तर दोन ठाकरे बंधू बोलतील; ठाकरेंच्या नेत्याचा खोचक टोला
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
लव्ह यु दादा... भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवले, ते सांगता येणार नाही; अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल: हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले
Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
Embed widget