एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : तुझं कुणी न्हाय, मी हाय ना..., अरबाजच्या एग्झिटनंतर एकट्या पडलेल्या निक्कीला सूरजचा आधार, म्हणाला... "तुझा फोकस..."

Bigg Boss Marathi : तुझं कुणी न्हाय, मी हाय ना, असं म्हणत सूरज निक्कीला आधार देताना दिसणार आहे. एवढंच नाहीतर सूरज निक्कीला इथून पुढे कसं न घाबरता खेळावर फोकस करायचा, हेदेखील आजच्या भागात समजावून सांगताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरातून अरबाज पटेल (Arbaz Patel) यानं एग्झिट घेतली. संपूर्ण बिग बॉस मराठीच्या घरासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. सुरुवातीपासूनच स्वतःला स्ट्राँग समजणारा आणि सातत्यानं घरातल्या सदस्यांसमोर आपल्या ताकदीचं प्रदर्शन करुन विनर ठरण्याचा दावा करणारा अरबाज घरातून एलिमिनेट झाला. अरबाजचा बिग बॉस मराठीचा प्रवास थांबला, पण अगदी पहिल्या दिवसापासून अरबाजसोबत खेळणारी निक्की (Nikki Tamboli) मात्र काहीशी तुटलेली दिसली. अरबाझ एलिमिनेट झाल्याचं कळताच निक्की तांबोळी धायमोकलून रडू लागली. अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर त्याच्यासोबत असणारी निक्की मात्र आता एकटी पडणार की, काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता निक्कीच्या मदतीसाठी, अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर कोसळलेल्या निक्कीला आधार देण्यासाठी गुलिगत सूरज पुढे आला आहे.

तुझं कुणी न्हाय, मी हाय ना, असं म्हणत सूरज निक्कीला आधार देताना दिसणार आहे. एवढंच नाहीतर सूरज निक्कीला इथून पुढे कसं न घाबरता खेळावर फोकस करायचा, हेदेखील आजच्या भागात समजावून सांगताना दिसणार आहे. आपण या घरात एकटे आलोत आणि एकटेच जाणार आहोत, असं सूरज निक्कीला समजावतोय. 

सूरज : तुझं कोणी न्हाय, मी आहे ना... 

निक्की : हो, आहे ना, तू आहेस... 

सूरज : मग... बसायचं... आपली फॅमिली आहे, घर आपलं आहे... 

निक्की : मी कधी कोणासमोर असे हात जोडून भिक नाही मागितली, घरात थांबण्यासाठी... 

सूरज : स्ट्राँग व्हायचंय ना आपल्याला... मग... 

निक्की : स्ट्राँग आहे मी, स्ट्राँग आहे... पण तुला दुःख राहील ना यार... त्या दुःखात पुढे कसं जायचं...?

सूरज : दुःख राहीलच की, आता तुला मी एक सांगतो... ज्या आपल्या भावना असतात, त्या आपल्या डोळ्यांतून बाहेर पडतात... आपल्या जवळचा माणूस आपल्याला सोडून गेल्यावर... 

निक्की : प्रवास कठीण आहे, यापुढचा... 

सूरज : आपण एकटं आलोय, एकटं आपल्या घरी जाणार... फोकस गेमवर करायचा आता... खोटं बोलत न्हाय... मी लढणार... मलाही इमोशन्स आहेत... पण कसंय, इथे एकट्यानंच लढायचं आहे... त्यामुळे न्हाई तरास करुन घ्यायचा स्वतःला... 

दरम्यान, अरबाज एलिमिनेट झाल्यानंतर निक्की ओक्साबोक्सी रडू लागली. सूरजसोबत बोलतानाही निक्की अरबाज गेल्यामुळे दुःखी असल्याचं पाहायला मिळत आहे. आवंढा गिळत निक्की सूरजसमोर आपलं मन मोकळ करताना आजच्या भागात दिसणार आहे. 

अरबाजची घरातून एग्झिट 

बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट होते. यंदाच्या आठवड्यात बिग बॉसनी एलिमिनेशन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये प्रत्येक सदस्यासमोर एक बॅग ठेवली होती. त्यामध्ये सेफ असं कार्ड ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सूरज, जान्हवी आणि वर्षाताई हे तिघेजण सेफ झाले. पण निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये होते. यामध्ये अरबाजचा खेळ संपला असल्याचं बिग बॉसनं जाहीर केलं. त्यानंतर निक्की ओक्साबोक्सी रडताना दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून निक्की घरातल्यांना आता आम्ही दोघंच आहोत. आता तुम्ही तुमच्यामधल्यांना बाहेर काढणार, आम्ही दोघ सळोकी पळो करुन सोडू तुम्हाला असं बोलताना दिसत होती. पण अरबाज गेल्यामुळे निक्की आता एकटी पडणार की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
Manjra Dam: गुड न्यूज! मांजरा धरण अखेरीस 'एवढं' भरलं, बीड, धाराशिव, लातूरच्या पाण्याची चिंता मिटली
गुड न्यूज! मांजरा धरण अखेरीस 'एवढं' भरलं, बीड, धाराशिव, लातूरच्या पाण्याची चिंता मिटली
नंदुरबार : शहादा-तळोदा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच, आता अजितदादांच्या शिलेदाराने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
नंदुरबार : शहादा-तळोदा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच, आता अजितदादांच्या शिलेदाराने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Van : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनची दृश्य, 'माझा' चा Exclusive व्हिडिओABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 24 September 2024Badlapur Case Update : बदलापूर स्टेशनवर शिवसेनेकडून जल्लोष, बॅनर झळकलेAkshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला
Manjra Dam: गुड न्यूज! मांजरा धरण अखेरीस 'एवढं' भरलं, बीड, धाराशिव, लातूरच्या पाण्याची चिंता मिटली
गुड न्यूज! मांजरा धरण अखेरीस 'एवढं' भरलं, बीड, धाराशिव, लातूरच्या पाण्याची चिंता मिटली
नंदुरबार : शहादा-तळोदा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच, आता अजितदादांच्या शिलेदाराने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
नंदुरबार : शहादा-तळोदा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच, आता अजितदादांच्या शिलेदाराने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Pune News: पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवर मिळणार स्वस्तात चहा अन् पाणी; 'उडाण' योजनेच्या अंतर्गत प्रवाशांची ती मागणी पुर्ण
पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलवर मिळणार स्वस्तात चहा अन् पाणी; 'उडाण' योजनेच्या अंतर्गत प्रवाशांची ती मागणी पुर्ण
Maharashtra Weather Update: परतीच्या पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट जारी
परतीच्या पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Siddhivinayak Mandir Prasad : सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूत उंदराची पिल्लं? पाहा फोटो
सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूत उंदराची पिल्लं? पाहा फोटो
MPSC Exam 2024 : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर, कृषी सेवेच्या पदांचा समावेश
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, कृषी सेवेच्या पदांचा समावेश
Embed widget