Yogita Chavan Eliminate : निखिल दामले पाठोपाठ योगिता चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर, तिसऱ्याच आठवड्यात संपला खेळ
Yogita Chavan Eliminate : निखिल दामले पाठोपाठ योगिता चव्हाण हिने देखील बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे.
![Yogita Chavan Eliminate : निखिल दामले पाठोपाठ योगिता चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर, तिसऱ्याच आठवड्यात संपला खेळ Bigg Boss Marathi Season 5 Yogita Chavan Eliminate from Bigg Boss Marathi new season Ritiesh Deshmukh Bhaucha Dhakka Yogita Chavan Eliminate : निखिल दामले पाठोपाठ योगिता चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर, तिसऱ्याच आठवड्यात संपला खेळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/432d83532cb50443f9b76392c2aa2cbc1723999886041720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Yogita Chavan Eliminate : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) तिसऱ्या आठवड्यातून दोन स्पर्धक घराच्या बाहेर पडले आहेत. योगिता चव्हाण (Yogita chavan) आणि निखिल दामले (Nikhil Damle) या दोघांनीही बिग बॉसच्या घराच्या निरोप घेतला. याआधीच्या भाऊच्या धक्क्यावर योगिताने तिला घराबाहेर जायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती.
तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल आणि अभिजीत हे चौघे नॉमिनेट झाले होते. त्यापैकी अभिजीत आणि सूरज हे दोघेही घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेतून सेफ झाले. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घरातल्या सदस्यांचा निरोप घेतला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही सदस्याने निरोप घेतला नाही.
निखिल दामलेनेही घेतला घराचा निरोप
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात रितेश भाऊंनी घरातल्या स्पर्धकांना एक मोठा धक्का दिला. दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही प्रकारचं एलिमिनेशन झालं नाही, त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात दोन स्पर्धकांनी घराचा निरोप घेणार असल्याचं रितेशने सांगितलं. त्यामध्ये सुरुवातीला निखिलने घराचा निरोप घेतला आणि त्यानंतर योगिताने घराचा निरोप घेतला.
निखिल आणि योगिताने या सदस्यांना केलं नॉमिनी
घरातल्या सदस्यांना 50 कॉइनची पॉवर देण्यात आली होती. पण घराबाहेर पडण्याआधी सदस्यांना त्या पैशांसाठी कुणालातरी नॉमिनी करायचं आहे. त्यानुसार निखिलने त्याच्या कॉईनसाठी डीपी म्हणजेच धनंजयला आणि योगिताने आर्याला नॉमिनी केलं आहे.
तिसऱ्या आठवड्यात स्पर्धकांची शाळा
दरम्यान तिसऱ्या आठवड्यात रितेशने घरातल्या सगळ्याच सदस्यांची शाळा घेतली. वैभवने मालवणी भाषेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन, टास्कमध्ये केलेल्या गद्दारीवरुन त्याची कानउघडणी केली. त्याचप्रमाणे अरबाजलाही चांगलच सुनावलं. पण हा आठवडा गाजवलेल्या सूरजचं भरभरुन कौतुकही केलं. त्यातच दोन स्पर्धकांनी घरातून निरोप घेतला आहे. त्यामुळे आता चौथ्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)