Nikhi Damle Eliminate :तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्यांना धक्का, निखिल दामलेने घेतला बिग बॉसचा निरोप; घराबाहेर जाणारा दुसरा स्पर्धक कोण?
Bigg Boss Marathi New season Nikhil Damle Eliminate : बिग बॉसच्या घरातून निखिल दामलेने सगळ्यांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता निखिलचा बिग बॉसच्या घरातला खेळ संपला आहे.

Bigg Boss Marathi New season Nikhil Damle Eliminate : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi new season) घरात रितेश भाऊंनी तिसऱ्या आठवड्यात एक मोठा धक्का दिला. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घरातल्या सदस्यांचा निरोप घेतला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही सदस्याने निरोप घेतला नाही. पण तिसऱ्या आठवड्यात मात्र एक मोठा ट्विस्ट आणि मोठा धक्का घरातल्या सदस्यांना बसला. कारण तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्यांचा खेळ संपवण्याचा निर्णय बिग बॉसकडून घेण्यात आला.
तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल आणि अभिजीत हे चौघे नॉमिनेट झाले होते. त्यापैकी अभिजीत, सूरज आणि योगिता हे तात्पुरते सेफ झालेत. त्याचप्रमाणे एका सदस्याचा खेळ हे लवकरच जाहीर करण्यात आलं आणि त्या सदस्याचं नाव निखिल दामले असं आहे. दरम्यान आणखी एका सदस्याच्या नावाची घोषणा होणं अद्यापही बाकी आहे.
भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना धक्क्यावर धक्के
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. मालवणीच्या मुद्द्यावर रितेशने वैभवला झापलं, तर सूरजची पाठ थोपटली. रितेशने धनंजय, घन:श्याम या सगळ्यांना विचारतो की तुमच्या भागात कोणती भाषा बोलली जाते. त्यावर धनंजय बोलतो की, आमच्याकडे कोल्हापुरीच बोलली जाते. घन:श्याम म्हणतो की, आमच्याकडे नगरी भाषा बोलली जाते. त्यावर रितेश अंकिताला म्हणतो की, मला तुमची मालवणी कळते आणि तिच्यासोबत मालवणी भाषेत बोलतो. पुढे रितेश वैभवला म्हणतो की, तुम्हाला सांगितलं जात होत की, मालवणी ही बोलीभाषा आहे. पण तुम्हाला फक्त संचालक म्हणून मार्क कापायचे होते. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरले आहात. तुम्ही एकीकडे इरीनाला मराठी शिकवता आणि दुसरीकडे मालवणी मराठी नाही असं म्हणता. तुम्हाला जर अंकिताची मराठी कळत नाही मग इरीनाची मराठी कशी कळते, असा प्रश्न विचारला.
रितेशनेही थोपटली सूरजची पाठ
रितेशने भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत म्हटलं की, या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतलाय. ज्याने त्या संधीचं सोनं केलंय. त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. तुम्ही एकट्याने त्या सगळ्यांना टफ फाईट दिली आहे. झुंड में भेड़िये आते हैं, शेर अकेला आता है.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
