Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत सूरज चव्हाणला 'शिंदे शाही' कुटुंबाकडून खास गिफ्ट! आनंद शिंदे गाणार तर सूरज नाचणार...
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : सूरजसाठी आनंद शिंदे आणि कुटुंबाने खास गिफ्ट दिले आहे. 'शिंदे शाही' कुटुंबाकडून सूरजसाठी खास गाणं तयार होणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा यंदाच्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) सातवा आठवडा सुरू झाला आहे. या सीझनमधील घरातील प्रत्येक सदस्याने आपली छाप सोडली आहे. या सीझनमध्ये 'गुलिगत' फेम सूरज चव्हाणने आपल्या खेळाने आणि स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. सूरज चव्हाणच्या फॅन फॉलोईंगमध्येही मोठी वाढ झाली आहे. आता, सूरजसाठी आनंद शिंदे आणि कुटुंबाने खास गिफ्ट दिले आहे. 'शिंदे शाही' कुटुंबाकडून सूरजसाठी खास गाणं तयार होणार आहे. या गाण्याला आनंद शिंदे यांचा स्वर असणार असून सूरज चव्हाण हा स्वत: त्या व्हिडीओत दिसणार आहे.
'बिग बॉस मराठी'मध्ये वीकेंडला भाऊचा धक्क्यावर गणेशोत्सव स्पेशल एपिसोड पार पडला. अंकिता प्रभू वालावकर, पॅडी कांबळे अशी कोकणातील मंडळीही बिग बॉस मराठीच्या घरात आहेत आणि यंदाचे गणपती त्यांचे चुकलेत. अंकिताने अनेकदा याबद्दल तिची नाराजीही व्यक्त केली होती. अशातच बिग बॉस मराठी सार्वजनिक गणेसोत्सव मंडळात सदस्यांना स्पेशल गिफ्ट्स देण्यात आले. बिग बॉस सीझन 3 चा खेळाडू आणि गायक-संगीतकार-अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे याने घरातील काही सदस्यांना गिफ्टस दिले.
उत्कर्षने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सदस्यांसोबत सजावटीचा टास्क खेळला. रितेश देशमुखने स्पर्धकांसाठी गिफ्ट्स पाठवले होते. हे गिफ्ट्स उत्कर्षने घरात सदस्यांना दिले. या गिफ्टमुळे घरातील वातावरण भावुक झालेले पाहायला मिळाले. रितेशने या गिफ्ट्सच्या माध्यमातून काही फोटो पाठवले होते. ज्यामध्ये सदस्यांच्या घरातील गणपतीचा फोटो आणि कुटुंबियांचा फोटो होता. तर, इतर काही सदस्यांसोबत सूरजलादेखील काहीही गिफ्ट्स मिळाले नाहीत. पण, उत्कर्षने आपण सूरजला एक खास गिफ्ट देणार असल्याचे जाहीर केले.
शिंदे कुटुंबाकडून सूरजला गिफ्ट...
उत्कर्षने म्हटले की, ''जान्हवी गिफ्ट मिळालं, अंकिताला मिळालं, डीपी दादा मिळालं, वैभवला मिळालं, पण सूरजचं काय? मी आता आलोच आहे. तर मी तुला भाऊ म्हणून एक गिफ्ट देतो. तुझ्यासाठी आम्ही शिंदेशाही कुटुंब एक गाणं बनवणार. हे गाणं आनंद शिंदे गातील. तू घरात 'कोंबडी पळाली' या गाण्यावर डान्स केला होतास, तसं हे गाणं असेल. एवढंच नव्हे तर तू त्या गाण्यात अभिनय पण करणार असल्याचे उत्कर्षने सूरजला सांगितले. उत्कर्षच्या या खास गिफ्टवर सूरजने आनंद व्यक्त करताना आभार मानले. तर, घरातील सदस्यांनीदेखील या आनंद व्यक्त केला.
इतर संबंधित बातमी :