एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : गुलिगत सूरजला समज देताना डीपीचा पारा चढला,, सॉरी नाही, तू...

Bigg Boss Marathi Season 5 : कॅप्टन्सीच्या टास्कनंतर गुलिगत सूरज चव्हाणला समजवताना धनंजय पोवारचा पारा चढला असल्याचे दिसून आले.

Bigg Boss Marathi New Season Day 19 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi Season 5) सदस्य दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली मजामस्ती यांमुळे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात आपल्या हजरजबाबीपणा दाखवणाऱ्या धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपीदादाचा तिखट कोल्हापुरी अंदाज दिसून आला. कॅप्टन्सीच्या टास्कनंतर गुलिगत सूरज चव्हाणला (Suraj Chavan) समजवताना धनंजय पोवारचा पारा चढला असल्याचे दिसून आले. 

कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सूरज चव्हाणचा समावेश अरबाजच्या ग्रुपमध्ये करण्यात आला. तर, वैभव चव्हाणचा समावेश हा अभिजीतच्या ग्रुपमध्ये करण्यात आला. या टास्कच्या दरम्यान, सूरजने प्रतिस्पर्धी गटातील सदस्याला अटकाव करण्यासाठी जोर लावला होता. सूरज हा थेट वैभवलाही भिडला होता. या कॅप्टन्सी टास्कनंतर घरात सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर प्रभू आणि डीपी गप्पा मारत असतात. कलर्स मराठीने जारी केलेल्या नव्या प्रोमोनुसार, सूरज चव्हाण हा डीपीला सॉरी बोलताना दिसतो. त्यावर डीपी दादा त्याला म्हणतो की, ''सॉरी नाही, कंट्रोल कर. तुला हे ही सांगतो, उद्या आमच्यात खेळत असताना समोर अरबाज, वैभव कोणीही असू देत तरीही असा खेळू नकोस. मला राग तू तिकडून असा खेळलास याचा नाही.” डीपीच्या बोलण्यावर अभिजीत सावंतही सहमती दर्शवतो आणि म्हणतो की, राग-ताकद यावर तुला नियंत्रण मिळवता आले पाहिजे. तुला आता हे हळूहळू समजेल. त्याच वेळी पॅडी कांबळे तिकडे येतो म्हणतो की, “तिथे आपले पण होते आणि त्यांचे पण होते. कोणालाही लागलं असतं.” धनंजय म्हणतो की, आपले किंवा त्यांचे असं खेळलं नाही पाहिजे. 

सूरज घाबरेल, दुखावेल या काळजीने अभिजीत सावंत धनंजयला म्हणतो की, “नका बोलू.” त्यावर डीपी चिडतो आणि म्हणतो, “एवढं काय मी शिव्या देत नाहीए की जोड्याने हाणत नाही.” अभिजीत आणि पंढरीनाथ म्हणतात,” कळलंय त्याला.” धनंजय म्हणतो, “मग विषय तुम्हीच बंद करा. हा नवीन विषय काढणार. तुम्ही वेगळं बोलणार.” त्यानंतर अभिजीत त्याला म्हणतो, “किती रागवता तुम्ही.” वातावरण गरम होत असल्याचे लक्षात येताच तिथे बसलेली अंकिता सगळ्यांना ‘झालं झालं’ असं म्हणत शांत राहायला सांगते. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की आणि अरबाजमध्ये वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत. घरातील हा दंगा पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येईल. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget