![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bigg Boss Marathi Season 5 : आर्याची हकालपट्टी, आता आणखी एका सदस्याची होणार एक्झिट; रितेश भाऊ घरात येऊन करणार नाव जाहीर
Bigg Boss Marathi Season 5 : आर्याला घराबाहेर काढल्यानंतर बिग बॉसच्या घरात आज एलिमिनेशन पार पडणार असून कोणाला नारळ मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
![Bigg Boss Marathi Season 5 : आर्याची हकालपट्टी, आता आणखी एका सदस्याची होणार एक्झिट; रितेश भाऊ घरात येऊन करणार नाव जाहीर Bigg Boss Marathi Season 5 Elimination after Arya out from the game Bigg Boss Marathi New Sesaon Bigg Boss Marathi Season 5 : आर्याची हकालपट्टी, आता आणखी एका सदस्याची होणार एक्झिट; रितेश भाऊ घरात येऊन करणार नाव जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/15/b3e1f64cb1e66d655a7e9afc3b3424d41726403359946720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Season 5 : नियमांचं उल्लंघन झालं म्हणून बिग बॉसने (Bigg Boss Marathi New Season) आर्याला घराबाहेर काढलं. पण आता नॉमिनेट झालेल्या सदस्यांची परीक्षा होणार असून कुणाला मोदक मिळणार आणि कुणाला नारळ याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या सुरु असलेल्या राड्यांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया विशेष लक्ष वेधून घेतयात. त्यातच आता या आठवड्यात घरातल्या कुणाचा प्रवास संपणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
'बिग बॉस' म्हटलं की नॉमिनेशनही आलं. ट्रॉफी जिंकण्यसाठी सदस्य एकमेकांचे पाय खेचताना दिसून येतात. त्यासाठी ते एकमेकांना नॉमिनेटदेखील करतात. या आठवड्यात अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित केले गेले. त्यामुळे आता अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव यांच्यापैकी कोणाला घरचा आहेर मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
सदस्यांसमोरच होणार नाव जाहीर
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ घरात असून तो बाहेर पडणार असलेल्या सदस्याबद्दल बोलताना दिसत आहे. रितेश भाऊ म्हणतोय,"आज घरातून कोण बाहेर जाणार हे मला जाहीर करायचं आहे. तुमच्यासमोर येऊन हे करणं माझ्यासाठी प्रचंड अवघड आहे. देशातील मराठी प्रेक्षकांनी ठरवलंय या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य आहे...". रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरुन बाहेर पडणाऱ्या सदस्याचं नाव न जाहीर करता घरात येऊन सदस्यांसमोरच करणार आहे. त्यामुळे आजच्या भागात एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)