(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार, रितेशदादाच्या स्टाईलमध्ये बिग बॉस मराठीचा नवा सीझन, या तारखेपासून सुरुवात
Bigg Boss Marathi New Season Latest Updates : बिग बॉस मराठी सीझन 5 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा सीजन रितेश दादाच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्ध शो बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा सीझन रितेश दादाच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत चॅनेलचे अनेक प्रोमो जारी केले आहेत. ज्यामध्ये रितेश दादाचा लयभारी अंदाज पाहायला मिळाला आहे. या सीझनमध्ये अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. पण, आता चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
'बिग बॉस मराठी'चा धमाका!
तंटा नाय तर घंटा नाय... रितेश भाऊचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरांत तोंडपाठ झाला आहे. यंदा 'बिग बॉस मराठी'ची धुरा रितेश देशमुखच्या हाती असेल. बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखची 'बॉसगिरी' पाहायला मिळाली. आता पुन्हा एक नवीन प्रोमो 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घराचं दार कधी उघडणार याची प्रतीक्षाही संपली आहे.
View this post on Instagram
यंदाचा सीजन रितेश दादाच्या स्टाईलने
रितेश देशमुखचा लयभारी अंदाज आणि स्पर्धकांचा कल्ला यामुळे यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या सीझनची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. एकंदरीत यंदा बिग बॉसच्या घरात सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार की नाही यासाठी तुम्हाली बिग बॉस पाहावा लागणार आहे. 'मी येणार तर कल्ला होणारच' असं रितेश देखमुख म्हणत असलेला प्रोमो व्हिडीओ आऊट झाला आहे. रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीखदेखील जाहीर केली आहेत.
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो पाहा
View this post on Instagram
बिग बॉस मराठी नव्या सीझनची तारीख जाहीर
मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त 15 दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या 'BIGG BOSS Marathi'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.
प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका
मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार! प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पाहा 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर आणि Jiocinema वर कधीही.