एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : "ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, ती हसत सांगतेय", वर्षा ताईंना त्रास देण्याचा जान्हवीचा प्लॅन; नेटकरी चांगलेच संतापले

Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवी, निक्की, अरबाज आणि वैभव यांना एकत्र झोपायचं होतं, त्यासाठी त्यांनी वर्षा उसगांवकर यांना त्रास दिला आणि हा प्लॅन जान्हवीचा असल्याचं तिने स्वत: कबूल केलं आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवीन सीझनचा पहिलाच आठवडा फारच रोमांचक ठरला. पहिल्याच दिवशी निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्याशी पंगा घेतला. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar), अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) यांचा ग्रुप झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या ग्रुपने वर्षा ताईंना त्रास दिल्याचं पाहायला मिळालं. जान्हवी, निक्की, अरबाज आणि वैभव यांना एकत्र झोपायचं होतं, त्यासाठी त्यांनी वर्षा उसगांवकर यांना त्रास दिला. यामुळे वर्षा ताईंना रस्त्यात झोपावं लागल्याचं पाहायला मिळालं.

बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय काय?

प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर सांगते की, "हे माझं प्लॅनिंग होतं". हे ऐकताच धनंजय पोवार जान्हवीचे पाय धरायला जातो. पुढे ती सांगते की, "ताईंना थोडंसं त्रास द्यायचा होता आणि आम्हाला माहित होतं की, ताई मोठ्या-मोठ्याने भांडत नाहीत". यावर अभिजीत सावंत म्हणाला की, "त्यामुळे वर्षा ताईंना दरवाजात झोपावं लागलं". यावर जान्हवी म्हणते, "रस्ता कुठंय तो". त्यावर धनंजय आणि अभिजीत तिला सांगतात की, "आम्हाला त्यांच्या अंथरुणावरुन जावं लागलं". धनंजय सांगतो की, त्याला जॅकेट हवं होतं, पण त्याला आत जायला मिळालं नाही. अभिजीतने सांगितलं की. "आम्हाला त्यांच्या अंथरुणावरुन चालत जावं लागलं. आता पूर्ण महाराष्ट्र बघतोय की, वर्षा ताईंसारखा मोठा कलाकार रस्त्यात झोपतोय आणि आम्ही त्यांच्या अंथरुणावरुन जातोय". पुढे जान्हवी म्हणते की, "कालही त्यांच्याशी बोलताना मी कोणतीही पातळी सोडून नाही बोलली". यावर पॅडी म्हणतो की, "बोलली नाहीस पण वागणं झालंय, तुझ्याकडून", यावर जान्हवी म्हणते, "हो वागणं झालंय". 

नेमकं काय घडलं?

रात्री झोपण्याच्या वेळेस वर्षा उसगांवकर रोजच्या जागी अंथरुन घालू झोपायला जातात. मात्र, त्यावेळी निक्की तांबोळी त्यांना त्रास द्यायला जाते, यानंतर जान्हवी किल्लेकर तिथे जाते आणि या दोघी वर्षा ताईंना त्यांच्या जागी झोपू देत नाहीत. निक्की आणि जान्हवी या गोष्टीवरुन वर्षा ताईंसोबत वाद घालतात. धनंजय पोवार, पॅडी आणि निखिल दामले निक्कीला तिची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण निक्की सांगते की, आम्ही सुधारणार नाही. यानंतर अखेरीस वर्षा ताई घरातील इतर सदस्यांचा मान राखून स्वत: रस्त्यात दरवाजाजवळ झोपण्यास तयार होतात.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

जान्हवी किल्लेकरवर टीकेची झोड

यानंतर दुसऱ्या दिवशी घडल्याप्रकाराबद्दल इतर सदस्य बाथरुम एरियामध्ये बोलताना दिसतात. यावेळी किर्तनकार पुरुषोत्तम, पॅडी, अभिजीत आणि धनंजय यांच्यासमोर जान्हवी मान्य करते की, रात्री जो प्रकार घडला त्याचा उद्देश वर्षा ताईंना त्रास देण्याचा होता आणि यामागचं डोकं तिचं होतं. यावर अभिजीत, धनंजय आणि पॅडी तिला तिची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात. याचा प्रोमो समोर आल्यानंतर आता नेटकऱ्यांनी जान्हवी किल्लेकरवर टीकेची झोड उठवली आहे.

जान्हवीवर नेटकरी चांगलेच संतापले

एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत म्हटलं की, "अरे पण त्रास तर त्यांना झाला ना आणि त्या एवढ्या मोठ्या अभिनेत्री आहेत, तू असं कसं वागू शकते? तू त्यांच्यासमोर काहीच नाही जान्हवी.",तर, "काय जान्हवी अग एका सिरिअलमध्ये साईड रोल करणारी तू… जान्हवी बाई तुझं जेवढं वय आहे ना, तेवढे सुपरहिट चित्रपट वर्षा मॅमने केलेत. एवढं लक्षात ठेव. कित्येक वर्षे ज्यांनी मराठी हिंदी मालिका, चित्रपटामधून लोकांचं मनोरंजन केलं त्यांच्याबद्दल तू प्लॅन करतेस?" असा सवाल एकाने उपस्थित केला आहे. आणखी एका नेटकऱ्याने अभिजीत सावंतच्या भूमिकेचं कौतुक केलंय. तर एका नेटकऱ्याने म्हटलंय, "हे सगळे सोंडके नंतर बोलतात. निक्की, जान्हवीच्या समोर बोलायची हिम्मत नाही होत".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : एक नंबर! अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता, आता सगळ्यांचा माज उतरणार; रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझाPankaja Munde Full Speech : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तकTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaKurla Bus Accident : आईचा मृतदेह आणण्यासाठी  ॲम्ब्युलन्ससाठी पैसे मागितले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Embed widget