Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून कीर्तनकार पुरुषोत्तमदादा बाहेर, 'राम कृष्ण हरी' म्हणत घेतली एक्झिट!
Kirtankar Purushottam Patil : बिग बॉस मराठीच्या घरातून पुरुषोत्तम दादा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडले आहेत.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) नव्या सीझनचा पहिला आठवडा पूर्ण झाला असून पहिलं एलिमिनेशन झालं आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून पहिल्या स्पर्धक एलिमिनेट झाला आहे. बिग बॉसच्या घरातून पुरुषोत्तम दादा बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडले आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने पहिल्या एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव जाहिर केलं. यानंतर पुरुषोत्तम दादा यांनी घरातील सदस्यांचा निरोप घेतला आणि बिग बॉसच्या घराबाहेर पडले.
पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार
बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार झाला आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि किर्तनकार पुरुषोत्तम पाटील हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. शनिवारी रितेश भाऊने दोन सुरक्षित सदस्यांची नावं जाहिर केली होती. त्यावेळी सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे दोघे सुरक्षित झाले होते. त्यानंतर इतर तिघांवर नॉमिनेशनची तलवार होती.
'राम कृष्ण हरी' म्हणत घेतली एक्झिट
View this post on Instagram
पुरुषोत्तम पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर
आज रितेश भाऊच्या धक्क्यावर एलिमिनेशनची घोषणा झाली, ज्यामध्ये योगिता आणि धनंजय सुरक्षित झाले आणि पुरुषोत्तम पाटील यांना घराबाहेर पडावं लागलं आहे. पुरुषोत्तम यांचं एलिमिनेशन झाल्यावर घरातील इतर सदस्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे याला यावेळी अश्रू अनावर झाले. पुरुषोत्तम दादा घराबाहेर पडताना घनश्यामनं त्यांना घट्ट मिठीही मारली.
सदस्यांना अश्रू अनावर
पुरुषोत्तमदादा पाटील पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडल्याने सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. माऊलींची अध्यात्माची बैठक असल्याने घरातील सदस्यांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. पुरुषोत्तमदादा बाहेर पडल्याने घरात आता 15 सदस्य उरले आहेत. पहिल्या 'भाऊच्या धक्क्या'नंतर आता हे 15 सदस्य जोमात खेळताना दिसून येतील.
बिग बॉसच्या घरात कल्ला
बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात खूपच राडा आणि कल्ला पाहायला मिळाला, यावरूनच यंदाचा सीझनही गाजणार अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. पहिला आठवडा निक्की तांबोळीने गाजवला. वर्षा उसगांवकर यांना या आठवड्यात त्रास झाला. चुकीच्या गोष्टींबाबत कुणीही भूमिका न घेतल्याने रितेशने इतर सदस्यांना झापलं. या आठवड्यात कॅप्टनसीही काढून घेण्यात आली होती. पुढच्या आठवड्यात मात्र, बिग बॉस मराठीच्या नवीन घरातील पहिला कॅप्टन होण्यासाठी जंगी सामना पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :