एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉस विजेत्या सूरजला 14 लाख, तर उपविजेत्या अभिजीत सावंतला किती बक्षीस मिळालं?

Bigg Boss Marathi Season 5 Winner : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजेता बनला आहे.

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा अखेर समारोप झाला आहे. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळाल्याने सूरज चव्हाण यंदाच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. टॉप 3 सदस्यांमध्ये सूरज, अभिजीत आणि निक्की हे सदस्य होते निक्की बाहेर गेल्यावर सूरज आणि अभिजीत यांच्या टक्कर होती. ज्यामध्ये सूरज चव्हाण जिंकला. सूरज चव्हाण विजेता तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. उपविजेत्या अभिजीत सावंतला काय बक्षीस मिळालं, ते जाणून घ्या.

सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5 चा विजेता

अखेर 70 दिवसांनंतर बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5 Winner) पाचव्या सीझनचा विजेता मिळाला आहे. सूरज चव्हाण याने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर 14 लाख रुपये, 10 लाखांचं गिफ्ट व्हाऊचर आणि ईव्ही बाईक बक्षीस म्हणून मिळाली आहे. यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, उपविजेत्या अभिजीत सावंतला काय मिळालं. अभिजीत सावंतला फक्त एक लाख रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर मिळालं.

सूरज चव्हाणला 14 लाख, अभिजीत सावंतला काय बक्षीस?

बिग बॉस मराठी पाचव्या सीझनच्या टॉप 2  मध्ये सूरज आणि अभिजीत सावंत होते. सूरजने ट्रॉफी जिंकल्याने त्याला ट्रॉफी, पैसे, गिफ्ट व्हाऊचर आणि बाईक मिळाली. मात्र, अभिजीत सावंतला एक लाख रुपयांच्या गिफ्ट व्हाऊचरवर समाधान मानावं लागलं. याशिवाय फर्स्ट रनर अप निक्कीलाही एक लाख रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर मिळालं.  त्याआधी ग्रँड फिनालेमध्ये सहा फायनलिस्ट असताना बिग बॉसने सदस्यांना 9 लाखांची रक्कम घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. त्यावेळी जान्हवी किल्लेकरने संधी साधली आणि पैसे घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

उपविजेत्या अभिजीत सावंतला काय मिळालं?

दरम्यान, ग्रँड फिनालेमध्ये विजेता सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांना बक्षीसाची रक्कम मिळाली. यासोबतच त्यांना आणि घरातील इतर सदस्यांना त्यांची आठड्याप्रमाणे ठरलेल्या मानधनाची रक्कम मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरज चव्हाणला दर आठवड्याला 25 हजार, अभिजीत सावंतला 3.50 लाख रुपये आणि निक्की तांबोळीला सर्वाधिक 3.45 लाख रुपये याप्रमाणे 14 आठवड्यांचं मानधन मिळेल. याचप्रमाणे इतर सदस्यांनाही त्यांची ठरलेली फी मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणच्या विजयानंतर प्रेक्षकांकडून पॅडीला कौतुकाची थाप; 'पॅडी दादा हे तुमच्यामुळे शक्य झालं', प्रेक्षकांनी मानले आभार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेटCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
Embed widget