Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉस फेम राकेश बापट रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करत दिली चाहत्यांना माहिती
राकेशनं (Raqesh Bapat) नुकताच हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) फेम अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) हा सध्या त्याच्या हेल्थमुळे चर्चेत आहे. राकेशनं नुकताच हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चाहत्यांना माहिती दिली की, तो रुग्णालयात दाखल झाला आहे. राकेशला का रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबाबत त्यानं कोणतीही माहिती अजून चाहत्यांना दिलेली नाही.
राकेशनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाताला ड्रिप लावलेली दिसत आहे. मात्र, या फोटोत राकेशचा चेहरा दिसत नाही. त्याने हा फोटो इव्हिल आय आणि थर्मामीटरच्या इमोजीसह शेअर केला आहे.
राकेश (Raqesh Bapat) हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीसोबतच्या (Shamita Shetty) त्याच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा झाली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतरही अनेकवेळा दोघेही एकत्र दिसले. मात्र, शमिता आणि राकेश यांचा नंतर ब्रेकअप झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली.
राकेशनं या मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम
राकेश हा को तू आशिकी, बिग बॉस 15, बात हमारी पक्की है, कुबूल है, नच बलिए 6 यांसारख्या शोमध्ये दिसली. त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. वो तुम बिन, दिल विल प्यार व्यार, कुछ दिल ने कहा, कोई मेरे दिल में है, गिप्पी, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. राकेशला टीव्ही शोमधून जास्त लोकप्रियता मिळाली. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अस्सी नब्बे पूर सौ या वेब शोमध्ये देखील काम केले आहे.
View this post on Instagram
राकेश हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. राकेश हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ची माहिती, तसेच त्याच्या पेंटिंग्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: