Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मधील 'तहलका' उर्फ सनी आर्याचा प्रवास संपला; वीकेंडचा वार भाईजान नव्हे करण जोहर करणार होस्ट
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरातील तहलका उर्फ सनी आर्याचा प्रवास संपला आहे. वीकेंडचा वार सलमान खान (Salman Khan) नव्हे तर करण जोहर (Karan Johar) होस्ट करणार आहे.
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या पर्वात कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता 'बिग बॉस 17'मधील 'तहलका' उर्फ युट्यूबर सनी आर्याचा (Sunny Arya) प्रवास संपला आहे. अभिषेकसोबत वाद घातल्याने सनीला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.
सनी आर्यचा 'बिग बॉस 17'मधील प्रवास संपला आहे. कमी वोट मिळाल्यामुळे नव्हे तर 'बिग बॉस'ने सांगितल्यामुळे सनी या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. तहलकाने 'बिग बॉस'च्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. अभिषेकसोबत वाद घालताना तो दिसून आला. त्यामुळे बिग बॉसने त्याला शिक्षा दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तहलका अभिषेकचं टी-शर्ट खेचताना दिसत आहे.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
ईशा मालवीय दिवसा झोपलेली असते. त्यामुळे अरुण तिला उठवताना दिसतो. दरम्यान अभिषेकला त्याची सांगण्याची पद्धत चुकीची वाटते. दरम्यान सनीदेखील या मुद्द्यावर त्याचं मत मांडतो. सनी आणि अरुण हे एकमेकांचे खास मित्र असून ते अभिषेकसोबत भांडतात. तहलका अभिषेकला अरुणपासून दूर राहण्यास सांगतो. तसेच त्याचं शर्टदेखील खेच खेचत अपशब्दांचा वापर करतो". तहलकाच्या या वागण्याने 'बिग बॉस'ने त्याला घरातून बाहेर काढलं आहे.
वीकेंडचा वार भाईजान नव्हे करण जोहर करणार होस्ट
सलमान खान 'बिग बॉस' हा कार्यक्रम वर्षानुवर्षे होस्ट करत आहे. पण काही कारणाने भाईजानला जेव्हा 'बिग बॉस' हा कार्यक्रम होस्ट करणं जमत नाही तेव्हा करण जोहर (Karan Johar) हा कार्यक्रम होस्ट करताना दिसतो. यंदाच्या वीकेंडचा वारलादेखील सलमान खान होस्ट करणार नाही. त्यामुळे करण जोहर हा कार्यक्रम होस्ट करताना दिसेल. याबद्दलचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर तहलकाला शिक्षा देत या बिग बॉसच्या घरातून बाहेर येण्यास सांगत आहे. 'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेले स्पर्धक मारामारी करू शकत नाही.
#WeekendKaVaar Tomorrow's Promo: Karan Johar BASH Ankita Lokhande and Mannara Chopra
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 30, 2023
And Tehelka hue physical Abhishek ke sath. Abhishek hue bekaabu,......pic.twitter.com/6vAQio9CvQ
संबंधित बातम्या