Bigg Boss 17 Premiere : 'बिग बॉस 17'चा ग्रँड प्रीमियर आज पार पडणार; कधी आणि कुठे पाहता येणार?
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चा ग्रँड प्रीमियर आज पार पडणार आहे.
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा कार्यक्रम होस्ट करत आहे. 'बिग बॉस 17' हा बहुचर्चित कार्यक्रम आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या कार्यक्रमात ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे.
'बिग बॉस 17'कुठे पाहाल?
'बिग बॉस 17'ची बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आजपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑक्टोबर रात्री 9 वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा वादग्रस्त कार्यक्रम पाहता येईल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. तसेच 24 तासांसाठी या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील जिओ सिनेमावर होणार आहे.
View this post on Instagram
'बिग बॉस 17'चं पर्व खूपच खास आहे असे म्हटले जात आहे. तीन भागांमध्ये स्पर्धकांची विभागणी होणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये याची झलक पाहायला मिळाली आहे. या पर्वात स्पर्धकांच्या जोड्या झालेल्या पाहायला मिळणार आहेत.
'बिग बॉस'च्या घराचा Inside Video आऊट!
'बिग बॉस'च्या घराचा इनसाइड व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भाईजान 'चोरी-चोरी चुपके से...' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. एकंदरीतच सलमान खानचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी तो सज्ज आहे.
'बिग बॉस'चं हटके घर
स्थापत्यकलेपासून प्रेरित होऊन 'बिग बॉस'चं घर तयार करण्यात आलं आहे. कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि वनिता गरुड यांनी हे घर डिझाइन केलं आहे. स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी या घराची खास रचना करण्यात आली आहे. 'बिग बॉस'च्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छान बगीचा आहे. डोळ्याचा आकार असणारा स्विमिंग पूल आहे. स्वयंपाकघरात लाकडाचा टायनिंग टेबल बनवण्यात आला आहे. लिव्हिंग एरिया युरोपियन टच देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या