Bigg Boss 16 : 'जर तुम्ही हिरो आहात.. तर खलनायकाची काय गरज?'; सदस्यांच्या वागणुकीवर बिग बॉसने घेतली शाळा
Bigg Boss 16 Update : अनेकदा सूचना देऊनही घरातील सदस्य नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे बिग बॉसने सदस्यांना फटकारले आहे.
Bigg Boss 16 Update : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Big Boss 16) अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. स्पर्धक केवळ भांडणात आणि वादविवादातच नाही तर घरातील नियमांचे उल्लंघन करण्यातही सदस्य सीमा ओलांडत आहेत. बिग बॉसच्या घरात येणारे सर्व स्पर्धक हे एक लोकप्रिय स्टार आहेत ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे. अशा वेळी त्यांचे चुकीचे वर्तन त्यांच्या चाहत्यांवर तसेच प्रेक्षकांवर चुकीची छाप पाडते. बिग बॉसमध्ये धूम्रपानासाठी स्वतंत्र खोली बनवण्यात आली आहे. कारण उघड्यावर धूम्रपान करण्यास मनाई आहे. मात्र, या सीझनमध्ये स्पर्धक वारंवार नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
अनेकदा सूचना देऊन, इशारे देऊनही साजिद खानसह स्पर्धक वारंवार नियम मोडत आहेत. आणि सर्वांसमोर धूम्रपान करत आहेत. मागच्या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं होतं. साजिद खान पुन्हा सर्वांसमोर धूम्रपान करताना दिसला आणि यावेळी बिग बॉसचा संयम सुटला. बिग बॉसने सर्व सदस्यांना गार्डन एरियामध्ये उभे केले आणि धूम्रपान कक्ष बंद केला. इतकंच नाही तर स्पर्धकांसाठी स्मोकिंग रूमच्या बाहेर असलेल्या बोर्डवर 'आम्ही मूर्ख आहोत' असं लिहिण्यात आलं होतं.
बिग बॉसने सुनावले खडे बोल
एवढेच नाही तर, बिग बॉसने सर्व स्पर्धकांचा अपमानही केला. बिग बॉस म्हणाले, “आज लोकप्रिय स्टार्स माझ्यासमोर उभे आहेत. तुम्हाला तुमच्या अनुभवाचा अभिमान असायला हवा. पण, तुमच्या एका कृतीची आम्हाला लाज वाटते. वारंवार अडवणूक करूनही सर्वांसमोर धूम्रपान करायचे आहे. तुम्ही सर्वजण ओळखीचे चेहरे आहात, तुमचे खूप चाहते आहेत. पाच वर्षांच्या मुलांपासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत, त्यांना काय संदेश द्यायचा आहे की धूम्रपान ही खूप चांगली सवय आहे. व्वा, तुझ्यासारखा हिरो असेल तर खलनायकाची काय गरज आहे. अशा शब्दांत बिग बॉसने सर्व सदस्यांची शाळा घेतली.
बिग बॉसने घरातील सदस्यांना आरसा दाखवला
बिग बॉस पुढे म्हणाले, "तुमच्या या सवयीला थांबवायचे की नाही हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. आणि तुमची इच्छा मी स्पष्टपणे पाहिली आहे आणि समजून घेतली आहे. त्यामुळे आतापासून स्मोकिंग रूम बंद आहे. तुम्ही स्मोकिंग रूमच्या बाहेर बसून स्मोकिंग करा आणि कॅमेऱ्यासमोर चाहत्यांना सांगा की धूम्रपान करणे चांगले का आहे." अशा शब्दांत बिग बॉसने सर्व सदस्यांना सुनावले. यावर सर्व स्पर्धकांनी बिग बॉसची माफी मागितली. मात्र, साजिद खानला आपल्या चुकीचा पश्चाताप झालेला दिसला नाही.
महत्वाच्या बातम्या :