एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : फराह खानचा टीना दत्तावर राग अनावर; भर कार्यक्रमातून निघाली बाहेर! पाहा व्हिडीओ

Bigg Boss 16 : या आठवड्यात फराह खान ‘बिग बॉस 16’चा ‘वीकेंड का वार’ हा एपिसोड होस्ट करताना दिसली.

Bigg Boss 16 : हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. बिग बॉसचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने कंबर कसली आहे. नुकताच या शोचा ‘वीकेंड का वार’ चा एपिसोड झाला. या आठवड्यात सलमान खानऐवजी फराह खान ‘बिग बॉस 16’चा ‘वीकेंड का वार’ हा एपिसोड होस्ट करताना दिसली. यावेळी फराह खान (Farah Khan) आणि टीना दत्तामध्ये चांगलीच टक्कर झालेली दिसली.

गेल्या आठवड्यात सलमान खानने टीना आणि शालीनची चांगलीच शाळा घेतली होती. यावेळी सलमान खानने दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या आठड्यात शालीनची साथ सोडून टीना दत्ता प्रियांकासोबत गेम प्लॅनिंग करताना दिसली. मात्र, प्रियांका देखील शालीनला त्रास देताना दिसली होती. यात टीना दत्ता तिला साथ देत होती. एकीकडे शालीन मानसिक समस्येशी झुंज देत आहे, तर, दुसरीकडे टीना आणि प्रियांका सतत त्याला त्रास देत होत्या. यामुळे शालीन अनेकदा घरात गोंधळ घालताना दिसला.

या संपूर्ण प्रकरणावर फराह खानने टीना दत्ताची चांगलीच शाळा घेतली. तर प्रियांकाला देखील फटकारले. टीना दत्ता तिच्या दाताच्या दुखण्यामुळे हैराण झाली होती. याच कारणामुळे तिला घराबाहेर जायचे होते. यावर फराह खान म्हणाली की, ‘टीनाच्या दाताच्या दुखण्याचा तुम्ही खूप बाऊ केलात आणि आता तिला घरातून बाहेर जायचे आहे. पण, शालीनची मानसिक अवस्था ठिक नाही, हे माहित असताना देखील तुम्ही त्याची चेष्टा करत गेलात. हे वागणं अतिशय लज्जास्पद होतं. तेव्हा तुम्हाला त्याची दया आली नाही.’

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर टीनाने देखील स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. टीना म्हणाली की, ‘हे अतिशय चुकीच्या पद्धतीने सादर केलं जात आहे. आम्ही असं काहीही चुकीचं वागलेलो नाही.’ मात्र, टीनाचं हे स्पष्टीकरण फराहला फारसं आवडलं नाही. फराहने टीनाला शांत बसण्यास सांगितले. मात्र, तरीही टीनाचं बोलणं अविरत सुरू होतं. यानंतर फराहने तिला निघून जाण्याची धमकी देखील दिली. त्यावर टीनाची प्रतिक्रिया पाहून फराह संतापली आणि तिने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. दोघींमधला हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Bigg Boss 16 :प्रियांका आणि शिव यांच्यात रुम ऑफ 4 वरून वॉर; दोघांचंही एकमेकांना ओपन चॅलेंज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Wardha Daura :  पीएम विश्वकर्मी योजनेचा वर्षपूर्ती सोहळा,  मोदींच्या वर्धा दौऱ्यात काय?सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 20 September 2024ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Horoscope Today 20 September 2024 : आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Embed widget