Shiv Thakare On Veena Jagtap : "आम्ही रिलेशनशिपमध्ये नसलो तरी,..."; वीणासोबतच्या नात्याबद्दल शिव ठाकरेने सोडलं मौन
Shiv Thakare : वीणा आणि माझा ब्रेकअप झाला असला तरी मी 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 16) सहभागी होण्यापूर्वी आम्ही संवाद साधला होता.
Shiv Thakare On Veena Jagtap : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता 'आपला माणूस' शिव ठाकरे व्हायला पाहिजे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण शिवला उपविजेतेपदावरचं समाधान मानावं लागलं आहे. आता अमरावतीकरांनी (Amravati) शिवचं जंगी स्वागत केलं असून नुकत्याच एका मुलाखतीत शिवने वीणा जगतापबद्दल (Veena Jagtap) भाष्य केलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे आणि वीणा जगतापने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. खेळ संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुलीदेखील दिली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहते मात्र नाराज झाले होते. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव वीणाबद्दल भाष्य करत म्हणाला,"वीणा आणि माझा ब्रेकअप झाला असला तरी मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी आम्ही संवाद साधला होता. आमच्यात मैत्रीचं नातं आहे".
View this post on Instagram
शिव ठाकरे पुढे म्हणाला,"बिग बॉस मराठी 2' आणि 'बिग बॉस 16' हे दोन्ही माझ्यासाठी खूप खास आहेत. या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. या प्रवासादरम्यान बनलेली नाती कायमच खूप खास असतील. दोन्ही 'बिग बॉस'मध्ये मी प्रामाणिकपणे खेळलो आहे. मी 'बिग बॉस 16'चा विजेता झालो नाही यागोष्टीचा मला पश्चाताप झालेला नाही".
शिव ठाकरे आणि वीणा जगतापच्या नात्याची तुफान चर्चा (Shiv Thakare Veena Jagtap Relationship)
शिव ठाकरे आणि वीणा जगताप 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 2) दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरातचं त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि त्यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. ब्रेकअप झालेला असताना त्यांनी त्यांची मैत्री मात्र कायम ठेवली. त्यामुळे ब्रेकअप झालेला असताना हे दोघे एकमेकांसोबत का बोलत आहेत? असे प्रश्न उपस्थित झाले. आता शिव ठाकरेने अखेर या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.