Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात Rakhi Sawant ने Abhijit Bichukale च्या चेहऱ्यावर फेकले पाणी
Bigg Boss 15 : राखी सावंतने बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेच्या चेहऱ्यावर पाणी फेकले आहे.
Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15' च्या प्रोमोमध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) बाटलीत पाणी भरत असताना अभिजीत बिचुकलेच्या चेहऱ्यावर (Abhijit Bichukale) फेकते. राखी रागात अभिजीतकडे जात असताना दिसली. दरम्यान प्रतीक तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर राखी प्रतीकवरदेखील चिडली.
मागील काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशमध्ये भांडण सुरू होते. पण आता दोघेही एकमेकांसोबत बोलू लागले आहेत. त्यांच्यातील मतभेददेखील दूर झाले आहेत. 'बिग बॉस 15' कार्यक्रमाला एका नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने राखीने या कार्यक्रमात प्रवेश केला आणि त्यात राखीने कोणतीही कसर सोडली नाही. राखीच्या बोलण्याने बिग बॉसच्या घरात अनेक वाद होत असतात. नुकतेच राखी आणि शमिता शेट्टी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर राखीच्या छातीत दुखू लागले होते.
View this post on Instagram
राखी सावंत आणि शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) 'तिकीट टू फिनाले' या टास्कदरम्यान कडाक्याचे भांडण झाले. गुरुवारच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते की, भांडणानंतर राखी देवोलीना आणि तेजस्वी प्रकाशसोबत गप्पा मारत असताना भावनिक होते. दरम्यान राखी आठवणींत रमली. त्यानंतर तिच्या छातीत दुखू लागले. राखी आणि शमिताच्या भांडणादरम्यान शमिताने तिला धक्का दिला होता. त्यामुळे राखी म्हणाली, शमिताने तिला धक्का दिला तेव्हा तिला खूप त्रास झाला कारण तिचे स्तन प्रत्यारोपण झाले आहे.
संबंधित बातम्या
Sunny Leone Controversy: सनी लिओनीच्या गाण्यावरुन वाद, साधूसंत म्हणाले, 'अश्लील डान्स'
Atrangi Re: 'अतरंगी रे' चित्रपटातील 'रेत जरा सी' गाण्यानं अक्षर कुमारला लावलं वेड, चक्क खांद्यावर स्पीकर घेऊन ऐकतोय एकच गाणं
Ganpath Teaser Out : टायगर श्रॉफच्या 'गणपत' सिनेमाचा टीझर आऊट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha