Atrangi Re: 'अतरंगी रे' चित्रपटातील 'रेत जरा सी' गाण्यानं अक्षर कुमारला लावलं वेड, चक्क खांद्यावर स्पीकर घेऊन ऐकतोय एकच गाणं
Atrangi Re: या चित्रपटात ए आर रहमान यांनी संगीत दिलंय.'चका चक', 'रैत जरा सी', 'गर्दा' या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Atrangi Re: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि दाक्षिणात्य स्टार धनुष (Dhanush) यांचा चित्रपट ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलंय. या चित्रपटात ए आर रहमान यांनी संगीत दिलंय.'चका चक', 'रैत जरा सी', 'गर्दा' या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण, रैत जरा सी या गाण्यानं अक्षर कुमारला वेड लावलंय. हे गाणं अक्षर कुमार वारंवार ऐकत असल्याचं त्यानं सांगितलंय.
नुकताच अक्षर कुमारनं त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत अक्षर कुमारच्या खांद्यावर स्पीकर दिसत असून तो चालताना 'रैत जरा सी' हे गाणं ऐकत आहे. व्हिडिओमध्ये त्यांची मुलगी निताराही लॉनमध्ये फिरताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अक्षयनं असं लिहलंय की, "ये हाथों से यूं फिसला है…हो जैसे रेत जरा सी" हे गाणं मी वारंवार ऐकत आहे. केवळ स्पीकरमध्येच नव्हेतर माझ्या डोक्यातही हेच गाणं सुरु आहे.
अक्षर कुमारची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
अक्षयनं यावर्षी बेल बॉटम, सर्यवंशी, अतरंगी रे या चित्रपटात काम केलंय. त्यानंतर पुढच्या वर्षीही त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अक्षय सध्या 'पृथ्वीराज' आणि 'OMG 2' चे शूटिंग करीत आहे. याशिवाय तो नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिससोबत 'राम सेतू'मध्येही दिसणार आहे. याशिवाय, 'बच्चन पांडे'मध्ये क्रिती सॅनॉनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. इतकेच नाही तर अक्षयनं नुकतीच 'गोरखा'ची घोषणा केली असून त्यात तो मेजर जनरल इयान कार्डोझोची भूमिका साकारणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha