Bigg Boss 12 : जसलीन-अनुप जलोटांच्या ब्रेकअपने जसलीनचे वडील खुश
"जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या ब्रेकअपमुळे मी आनंदी आहे. दोघांसाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण या जोडीला काही भविष्यच नव्हतं."

मुंबई : 'बिग बॉस-12'मधील स्पर्धक 65 वर्षीय अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षीय गर्लफ्रेंड जसलीन मथारू यांच्या ब्रेकअपच्या बातमीनंतर जसलीनच्या वडिलांना आनंद झाला आहे. अनुप जलोटा आणि जसलीनच्या अफेयरच्या चर्चेनंतर जसलीनच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता.
'एबीपी न्यूज'सोबत बोलताना जसलीनचे वडील केसर मथारू यांनी सांगितलं की, "होय, मी जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या ब्रेकअपमुळे आनंदी आहे. दोघांसाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण या जोडीला काहीच भविष्य नव्हतं. दोघांना समजवण्याची वेळ आली नाही आणि त्यांनीच वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे."
"बिग बॉस-10मध्ये या दोघांचं नातं समोर आलं होतं आणि आता याच शोच्या माध्यमातून या नात्याचा शेवट होत आहे. त्यामुळे वडील म्हणून यापेक्षा चांगली बातमी काही नसेल. दोघांच्या वयामध्ये बरच अंतर असल्याने हे नातं फार काळ टिकणार नव्हतं. त्यामुळे भविष्यात हे होणारच होतं, ते आज झालं आहे. यापेक्षा चांगली गोष्ट काय असूनच शकत नाही. अनुप जलोटा आणि जसलीन यांनीही याबाबत आनंदी असायला हवं", असंही केसर मथारू यांनी म्हटलं.
अपहरण टास्कमुळे ब्रेकअप दोघांमध्ये ब्रेकअपची सुरुवात या आठवड्यात घरातील सदस्यांना दिलेल्या नॉमिनेशन टास्कने झाली. या टास्कमध्ये सिंगल सदस्यांना जोडीपैकी एकाचं अपहरण करायचं होतं. त्याला सोडण्यासाठी अपहरणकर्ते कोणतीही अट ठेवू शकत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण करुन आपल्या जोडीदाराला वाचवू शकतो किंवा मागण्या पूर्ण न झाल्याने सिंगल सदस्य पुढच्या नॉमिनेशनपासून सुरक्षित होऊ शकतो.
या टास्कमध्ये अपहरणकर्ते बनलेल्या दीपिका आणि नेहा, अनुप-जसलीनच्या जोडीपैकी अनुप जलोटा यांचं अपहरण करतात. त्यांना सोडवण्यासाठी जसलीनसमोर कपडे, मेकअपचं साहित्य आणि केस कापण्याची मागणी करतात. परंतु जसलीनने असं काहीही करण्यास नकार दिला. यामुळे नाराज अनुप जलोटा यांनी प्राध्यान्यांवर प्रश्न उपस्थित केला. अनुप माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण कपडे आणि मेकअपही तेवढेच खास असल्याचं जसलीन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
टास्कविषयी जसलीनचे वडील म्हणाले की, "जसलीन नखे कापण्याआधीही अनेकदा विचार करते. ती आपली स्टाईल आणि गरजेच्या वस्तूंची खूप काळजी घेते. जसलीनला तिचे कपडे आणि केसांवर खास प्रेम आहे. त्यामुळे जसलीन अशा टास्कसाठी तिच्या आवडीच्या वस्तूंचा त्याग कधीच करणार नाही. ती भविष्यातही कोणासाठी असं करणार नाही. त्यामुळे तिने कसलाही विचार न करता टास्कला नकार दिला."
अनुप जलोटांनी केली ब्रेकअपची घोषणा जसलीनच्या या वर्तनावर अनुप जलोटा यांनी नाराजी व्यक्त केली. "या शोमध्ये मी जसलीनच्या हट्टामुळे आलो. जर तिला कपडे आणि मेकअप साहित्याचा मोह सोडता येत नाही, तर हे नातं आणखी पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही. आता मी एकटाच आहे आणि ही जोडी तोडत आहे," असं अनुप जलोटा यांनी म्हटलं. "अशाप्रकारच्या टास्कमध्ये माणुसकीचा शोध लागतो. जर हा टास्क मला दिला असता, तर मी माझे सगळे कपडे आणून ठेवले असते. टास्कमध्ये कपडेच द्यायचे होते, जीव तर नाही. मी निर्णयावर ठाम असून तो आता कोणीही बदलू शकत नाही," असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
Bigg Boss 12 : एका टास्कमुळे अनुप-जसलीन यांचं ब्रेकअप!
अनुप जलोटा बिग बॉसमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे स्पर्धक
FTII सोसायटीच्या सदस्यपदी अनुप जलोटा, हिरानी, कंगना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
