एक्स्प्लोर
युवराज सिंहच्या वहिनीचे युवराजवर गंभीर आरोप

नवी दिल्ली: टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंहची रणजी करंडकात चमकदार कामगिरी सुरु असताना, दुसरीकडे त्याच्या लहान भावाची पत्नी आणि बिग बॉसच्या 10 व्या पर्वातून बाहेर झालेल्या आकांक्षा शर्माने युवराजवर गंभीर आरोप केले आहेत.
आकांक्षा शर्माने बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंह आमली पदार्थांचे सेवनाचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही, तर तिने या मुलाखतीमध्ये युवराज धूम्रपानही करत असल्याची कबुली त्यानेच आपल्याला दिली असल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.
या मुलाखतीमध्ये आकांक्षाने आपली सासू आणि युवराजची आई शबनम यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आकांक्षा म्हणाली की, बिग बॉसच्या 10 व्या पर्वाच्या प्रवेशावेळी जी भूमिका मांडली, त्यावर आजही आपण कायम असल्याचे सांगितले. तसेच युवराजचा लहान भाऊ जोरावरसोबतचे आपले लग्न हे फक्त कागदावरच असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, यावर युवराजच्या आईकडून आद्याप कसलेही स्पष्टीकरण आले नाही. पण यापूर्वी आकांक्षाच्याबाबत युवराजची आई शबनम सिंह यांनी स्पष्टीकरण दिले होते.
संबंधित बातमी
युवराज सिंहच्या आईनं बिग बॉसमध्ये गेलेल्या सुनेच्या अडचणी वाढवल्या!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
