एक्स्प्लोर

EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय

EPFO: ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक पार पडली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याता आला आहे. नव्या निर्णयामुळं ईपीएफओ खातेदारांना दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत पीएफ खातेदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पीएफ खात्यात शिल्लक ठेवण्याची किमान रक्कम 25 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. हे उदाहरण अधिक सोपं करुन समजून घ्यायचं असेल तर एखाद्या खातेदाराच्या खात्यात 10 लाख रुपये शिल्लक असतील तर त्याला अडीच लाख रुपये खात्यात शिल्लक ठेवायला लागणार होते. आता नव्या निर्णयानुसार पीएफ खातेदार खात्यातून 9 लाख रुपये काढता येतील आणि खात्यात 1 लाख रुपये शिल्लक ठेवता येतील. 

ईपीएफओच्या सीबीडीनं निवृत्तीनंतर एकाच वेळी पैसे काढण्याऐवजी  SWP म्हणजेच सिस्टीमेटिक विड्रॉल प्लान देखील मंजूर केला आहे.  यामुळं पीएफ खातेदारांच्या हातात जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे मिळतील. इतर पैसे खात्यात राहतील आणि खातेदाराला व्याज मिळेल.

खात्यातील 90 टक्के रक्कम काढता येणार  

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सीबीटीच्या बैठकीतील निर्णयानुसार कर्मचारी आता त्यांच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतात. आता त्यांना गरजेच्या वेळी अधिक पैशांची तजवीज करताना अधिक विचार करावा लागणार नाही. गरजेच्यावेळी आवश्यकतेनुसार पैसे काढता येतील. अटी आणि नियमांसह गरजेच्यावेळी 90 टक्के रक्कम खात्यातून काढता येईल. तर, खात्यात 10 टक्के रक्कम राहील. 

पेन्शन वाढीची चर्चा पण निर्णय नाहीच

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत ईपीएस पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या ईपीएस अंतर्गत मिळणारी पेन्शन 1000 रुपये आहे. पेन्शनमध्ये वाढ करुन ती 7500 रुपये करावी अशी पेन्शनधारकांची मागणी होती. मात्र, ती रक्कम 3000 रुपये केली जाऊ शकते, अशा देखील चर्चा होत्या. मात्र, या बैठकीत पेन्शनवर काही चर्चा झालेली नाही.  

दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 16 सप्टेंबरपासून ईपीएफओ वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरुन वाढवून 25 हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळं 50 लाखांहून अधिक कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत येतील. यामुळं अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळेल.

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Embed widget