Suchandra Dasgupta : बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं रस्ते अपघातात निधन; ड्रायव्हरला अटक
Suchandra Dasgupta : बंगाली मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं रस्ते अपघातात निधन झालं आहे.

Suchandra Dasgupta Death : बंगाली मालिकांमध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं (Suchandra Dasgupta) निधन झालं आहे. रस्ते अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे. सुचंद्राच्या निधनाने बंगाली मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी रात्री सुचंद्रा दासगुप्ता एका बाईकवरुन शूटिंग करुन घरी परतत होत्या. दरम्यान बारानगर पोलीस ठाण्याच्या घोसपाडाजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीटी रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पण नंतर पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली. आता ट्रक चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
सुचंद्रा (Suchandra Dasgupta) ही बंगाली मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक बंगाली मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'गौरी' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. या मालिकेचं शूटिंग पूर्ण करुन ती शनिवारी घरी जात होती.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार,सुचंद्रा बाईकवरुन घरी परतत होती. तेव्हा बडानगर जंक्शनजवळील सिग्नलवर त्यांच्या दुचाकीसमोर एक दुचाकी आली. दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने सुचंद्रा दुचाकीवरून पडली. दरम्यान मागून आलेल्या 10 चाकी वाहनाने त्यांना चिरडले. अभिनेत्रीने हेल्मेट घातले होते. परंतू, अपघातात हेल्मेटचेही तुकडे झाले. हा अपघात प्रचंड भयानक होता. तो पाहताना तिथे उपस्थितांचाही थरकाप उडाला.
View this post on Instagram
सुचंद्राने अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण 'गौरी एलो' या मालिकेच्या माध्यमातून सुचंद्राच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. दर्जेदार अभिनयाच्या जोरावर सुचंद्राने सर्वांना थक्क केलं आहे. सुचंद्राच्या निधनाने बंगाली मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या अपघाताने बंगाली कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.
सुचंद्रा दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका 'गौरी'मध्ये सह-अभिनेत्री म्हणून काम करत होती. या मालिकेच्या माध्यमातून सुचंद्राला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला होता. मात्र आता तिच्या निधनाने सगळे हळहळ व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या
Entertainment News Live Updates 21 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
