![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashirwad Tuza Ekveera Aai : मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत; उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका
Ashirwad Tuza Ekveera Aai : 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' ही मालिका उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Ashirwad Tuza Ekveera Aai : मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत; उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका Ashirwad Tuza Ekveera Aai Mayuri wagh as Ekveera Aai The new series will be available to the audience from tomorrow Ashirwad Tuza Ekveera Aai : मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत; उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/27/39d12290ea6d3c83061fe2347d43adc21669537662411254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashirwad Tuza Ekveera Aai : मालिकाविश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत उद्यापासून 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' (Ashirwad Tuza Ekveera Aai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत एकवीरा आईच्या भूमिकेत मयूरी वाघ दिसणार आहे. तर अमृता पवारदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मयूरीने अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. मात्र या मालिकेत ती आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेचे दोन वेगवेगळे उत्कंठावर्धक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यातील आशयावरून असे लक्षात येते की कलियुगातल्या दानवांचा नाश करण्यासाठी आणि संकटातून आपल्या भक्तांना तारण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन एकवीरा आई येत आहे.
View this post on Instagram
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मयूरी वाघ म्हणाली, या मालिकेत मी एकवीरा आईची भूमिका साकारत आहे. एकवीरा आईचे चमत्कार आपण ऐकले आहेत. अनेकांनी ते अनुभवले आहेत. संकटातून एकवीरा आई आपल्या भक्तांना कशी तारून नेते हे आता तुम्हाला आता पाहायलाही मिळणार आहेत. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराला वाटत. आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र एखादी पौराणिक भूमिका आपण करावी असं मला वाटत होत. त्याच वेळेस एकवीरा आईच्या आशीर्वादाने ही भूमिका चालून आली. यामध्ये एकवीरा आईची भूमिका साकारन ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकवीरा आईच्या भक्तांना ही मालिका आवडेल अशी अपेक्षा आहे".
आशीर्वाद तुझा एकवीरा आई
कधी होणार सुरू? 28 नोव्हेंबर
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
किती वाजता? रात्री 8
संबंधित बातम्या
Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना रुग्णालयात दाखल; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला सल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)