एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Arbaz Patel : निक्कीने टीमच्या गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Arbaz Patel : कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये निक्कीने ग्रुप ऐवजी आपलाच गेम प्लान पुढे घेऊन गेल्याने अरबाजच्या संतापाचा भडका उडणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Arbaz Patel : 'बिग बॉस'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. या आठव्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कही सुरू झाला आहे. बुधवारी झालेल्या कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून  पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडीदादा आणि अंकिता वालावलकर बाहेर पडले आहेत. मात्र, आता यावरून  ग्रुप ए मध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) ग्रुप ऐवजी आपलाच गेम प्लान पुढे घेऊन गेल्याने अरबाज पटेलच्या (Arbaz Patel) संतापाचा भडका उडणार आहे.

बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सीचा टास्क दिला आहे. त्यानुसार, घरातील सदस्यांना अंडे मिळवून कॅप्टन पदाच्या शर्यतीत नको असणार्‍या सदस्याच्या नावाने असलेल्या घरट्यात अंडे टाकायचे आहे. यासाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले. टीम ए मध्ये निक्की, अरबाज, वर्षाताई, सूरज आणि डीपीदादा आहेत. तर, टीम बी मध्ये  जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पॅडी आहेत.  टास्क सुरू होण्याआधी टीम ए आपली स्ट्रॅटेजी ठरवात. त्यावेळी अभिजीत आणि संग्रामला  पहिल्या फेरीत बाहेर काढूयात असे अरबाज म्हणतो. तर, निक्की ही जान्हवीच्या नावासाठी आग्रही असते. मात्र, अरबाज हा जान्हवीला पुढच्या राऊंडला बाहेर काढूयात असे सांगतो.

निक्कीने प्लानचा बोऱ्या वाजवला...

कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन नको असलेल्या सदस्याला बाद करायचे असते. पहिल्या फेरीत टीम ए कडून अरबाज आणि निक्की येतात. तर, टीम बी कडून संग्राम आणि जान्हवी येतात. पहिल्या फेरीतील दोन्ही वेळेस अरबाज संग्रामला रोखतो तर निक्की अंड मिळवण्यास यशस्वी होते. मात्र, ग्रुपमध्ये ठरल्यानुसार निक्की संग्राम आणि अभिजीतला कॅप्टन्सी मधून बाद करत नाही. त्याऐवजी तिने अंकिता आणि पॅडीदादाला कॅप्टन्सीमधून बाद करते. 

अरबाजच्या संतापाचा भडका...

बिग बॉसच्या नव्या प्रोमोनुसार, निक्कीने स्वत:चा गेम प्लान पुढे नेल्याने अरबाज आणि तिच्यात वादाचा भडका उडाला असल्याचे दिसून येते. आपण ठरवल्यानुसार तू निर्णय घेतला नसल्याचे अरबाज निक्कीला म्हणतो. त्यावर निक्की ही मी विसरले असे सांगते. त्यावर अरबाज हा रागाने तू इतक्या लवकर कशी विसरली असा विचारतो. अरबाज हा संतापला असल्याचे प्रोमोत दिसून आले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

डीपीदादा काय करणार?

निक्कीने गेम प्लान फसवल्याने नाराज झालेला अरबाज आता आपला गेम प्लान डीपीदादाला सांगणार आहे. मात्र, डीपीदादा त्याचे ऐकणार का,  डीपीदादाही निक्कीप्रमाणे स्वतंत्र गेम खेळून अरबाजला धक्का देणार का? हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखलABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
Embed widget