Anupama Serial Updates : 'अनुपमा'मध्ये होणार नव्या पात्राची एन्ट्री, मालिकेत येणार ट्वीस्ट; यशदीप-अनुच्या मैत्रीवर होणार परिणाम?
Anupamaa Spoiler : यशदीप हा अनुपमाचा ऑफिसमधील बॉसच नाही तर चांगला मित्रदेखील आहे. यशदीपला अनुपमा आवडू लागली आहे. मात्र आता अनुपमा मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे.
Anupamaa Spoiler : हिंदीतील छोट्या पडद्यावरील मालिका अनुपमामध्ये (Anupamaa) धमाकेदार ट्वीस्ट येणार आहे. या शोमध्ये नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकातही बदल होणार आहे. यशदीप हा अनुपमाचा ऑफिसमधील बॉसच नाही तर चांगला मित्रदेखील आहे. यशदीपला अनुपमा आवडू लागली आहे. मात्र आता अनुपमा मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे.
अनुपमा आणि यशदीपच्या मैत्रीवर परिणाम होणार?
यशदीपला अनुपमा आवडू लागली. यशदीप अनुपमाला आनंदी पाहण्यासाठी तिला मदत करत राहतो. IWM Buzz च्या रिपोर्टनुसार, यशदीपची प्रेयसी आता मालिकेत एन्ट्री होणार आहे. 'काव्या एक जज्बा, एक जुनून' फेम अभिनेत्री परख मदन यशदीपच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
मालिकेत सुरू आहे लव्ह ट्रँगल...
सध्या या मालिकेत अनुपमा, अनुज आणि श्रुती यांच्यात लव्ह ट्रँगल सुरू आहे. अनुजने अनुपमाकडे आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्याचबरोबर श्रुतीने अनुज-अनुपमाबद्दलचे सत्यही जाणून घेतले आहे. अनुजचे म्हणणे ऐकूनही, अनुपमा आध्यासाठी अनुजसोबतच्या नात्यात पुढे जाण्यास नकार देत आहे. रुती आणि आध्यासोबतच राहावे, असे अनुपमाने म्हटले आहे. त्याचबरोबर अनुपमापासून पाच वर्षे दूर राहूनही अनुजचे अनुपमावरील प्रेम कमी झालेले नाही.
यशदीपचे जडलं प्रेम
अनुज-अनुपमा आणि श्रुतीच्या प्रेम त्रिकोणाशिवाय यशदीपचे अनुपमावर असलेले प्रेम देखील शोमध्ये ट्विस्ट निर्माण करत आहे. यशदीपने अद्याप अनुपमाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. पण, आता यशदीपच्या मैत्रिणीच्या एन्ट्रीने शोमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. यशदीपच्या अनुपमाबद्दलच्या भावना प्रकट होतील की नाही हे देखील या शोमध्ये पाहायचे आहे.